बहुतांश संभाषण कोकणीतूनच करा; आमदार दिगंबर कामत यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 11:22 IST2023-10-25T11:22:33+5:302023-10-25T11:22:52+5:30
आपली मातृभाषा अभिमानाने बोलायची असते. ती आपली अस्मिता आहे, असे आमदार कामत म्हणाले.

बहुतांश संभाषण कोकणीतूनच करा; आमदार दिगंबर कामत यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : मंगळूरच्या मांड सोभाण या संस्थेने निर्मिती केलेल्या 'अस्मिताय' या चित्रपटाचा प्रीमियर शो शुक्रवारी सायंकाळी मडगावच्या रवींद्र भवनमध्ये झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिगंबर कामत उपस्थित होते. कोकणी आमची अस्मिता असून बहुतांश संभाषण हे कोकणीतून होणे गरजेचे आहे, असे मत आमदार कामत यांनी व्यक्त केले.
यावेळी निर्माते लुईस पिंटो, - दिग्दर्शक विलास क्षत्रिय, कलाकार प्रिन्स जेकब, साईश पाणंदीकर उपस्थित होते. कोकणीवरचे आपले प्रेम कृतीतून दाखविणे गरजचे आहे. त्यासाठी 'अस्मिताय' हा कोकणी चित्रपट गोमंतकीयांनी पाहावा, असे आवाहन आमदार कामत यांनी केले. यावेळी मांड सोभाणतर्फे आमदार कामत यांचा सत्कार करण्यात आला
मी कोकणीच बोलतो
मी आताच नव्हे तर मुख्यमंत्री असतानादेखील बहुतांश कार्यक्रमांत कोकणीतूनच भाषण करतो. त्यामुळे मला इंग्रजी येत नाही असे काहींना वाटले असेल. मात्र, आपली मातृभाषा अभिमानाने बोलायची असते. ती आपली अस्मिता आहे, असे आमदार कामत म्हणाले.