राज्य सहकारी बँकेचे विभाजन

By Admin | Updated: December 27, 2015 01:26 IST2015-12-27T01:26:31+5:302015-12-27T01:26:44+5:30

पणजी : गोवा राज्य सहकारी बँकेचे विभाजन झाले असून दमण, दिव, दादरा-नगर हवेली या भागातील एकूण नऊ शाखा

Division of State Co-operative Bank | राज्य सहकारी बँकेचे विभाजन

राज्य सहकारी बँकेचे विभाजन

पणजी : गोवा राज्य सहकारी बँकेचे विभाजन झाले असून दमण, दिव, दादरा-नगर हवेली या भागातील एकूण नऊ शाखा गोवा राज्य सहकारी बँकेपासून वेगळ्या करण्यात आल्या आहेत. राज्य सहकारी बँकेच्या उद्या रविवारी होणाऱ्या आमसभेवेळी यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
गोवा राज्य सहकारी बँकेचा बहुराज्य बँक दर्जाही आता राहिलेला नाही. आता ही बँक पूर्णपणे गोव्याची शिखर संस्था म्हणून कार्यरत राहील, तर दमण-दिव-दादरा-नगर हवेलीमधील ९ शाखांची मिळून एक स्वतंत्र बँक बनेल. त्याबाबतचे सोपस्कार पार पडले आहेत. आता प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे, असे बँकेचे चेअरमन उल्हास फळदेसाई यांनी (पान २ वर)

Web Title: Division of State Co-operative Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.