हरमल बालहक्क समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By Admin | Updated: May 3, 2014 14:19 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T14:19:11+5:30

हरमल बालहक्क समितीची बैठक नुकतीच पंचायत कार्यालयात होऊन त्यात बालकांच्या सर्वांगीण विकासाला महत्व देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना प्राधान्यक्रमाने न्याय मिळवून देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

Discussion on various topics in the meeting of Harmal Balhak Committee | हरमल बालहक्क समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

हरमल बालहक्क समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

मांद्रे : हरमल बालहक्क समितीची बैठक नुकतीच पंचायत कार्यालयात होऊन त्यात बालकांच्या सर्वांगीण विकासाला महत्व देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना प्राधान्यक्रमाने न्याय मिळवून देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
बैठक बाल पंचायतीचे हरमल समितीचे अध्यक्ष इनासियो डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यापूर्वी समितीतर्फे लहान मुलांनी बाल पंचायतीच्या ग्रामसभेत गावातील अनेक समस्या मांडल्या होत्या. त्या समस्यांची दखल घेऊन समस्या निगडीत संबंधीत खात्याकडे कायदेशीर पत्रव्यवहार करण्यात आला होता. या संदर्भात काही खात्यांकडून उत्तरे मिळाली तर काहींकडून प्रत्यूत्तर न आल्याने त्याचा पाठपुरावा म्हणून पुन्हा एकदा पत्रव्यवहार करण्याचे ठरले. गावात कुठेच लहान मुल शिक्षणापासून वंचित राहू नये. ते मुल अन्याय-अत्याचाराला बळी पडू नये यासाठी बाल पंचायतीच्या सदस्यांनी गावात फिरून त्याचे सर्वेक्षण करण्यात यावे यासंदर्भात ठराव घेण्यात आला.
गावात पंचायतीच्या धर्तीवर बाल पंचायत स्थापन करण्याचा फतवा काढण्यात आला आहे. जेणेकरून बालकांना व्यासपीठ मिळून त्याचे न्याय-हक्क सुरक्षित राहिल. या बाल पंचायतीवर गावातील प्रभागवार १८ वर्षे वयोगटापर्यंतचे बाल सदस्य निवडण्यात येतील. त्यांनी आपल्या समस्या बालहक्क समितीसमोर ठेवल्यानंतर बालहक्क समिती त्याचा पाठपुरावा करून त्या कार्यान्वीत करतील अशी माहिती चिल्ड्रन राईट इन गोवाच्या अधिकारी स्नेहल साळगावकर यांनी मार्गदर्शन करताना दिली. बालकांचे हक्क, त्यांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बालहक्क समितीने देशाची भावी पिढी सुरक्षित व सुसंस्कारीत ठेवण्यासाठी बालहक्क समितीची फार मोठी जबाबदारी असल्याचे चिल्ड्रन राईट गोवाच्या अधिकारी व्हेनन्सीया कार्दोज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत समितीचे अध्यक्ष इनासियो डिसोझा, सचिव लक्ष्मण ओटवणेकर, सिस्टर आवेलिना, सरपंच सुवर्णा ठाकूर, अंगणवाडी सेविका लता वस्त, महिला मंडळ प्रतिनिधी फ्लोरिंडा मेडोन्सा, फ्लाविया डिसोझा, विद्यार्थी प्रतिनिधी जोएल मेडोन्सा आदींनी आपला सहभाग दर्शविला.समितीची पुढील बैठक शनिवार दि. २४ रोजी हरमल पंचायत कार्यालयात सायं. ३.३० वा. होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Discussion on various topics in the meeting of Harmal Balhak Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.