गोव्यात पूर्णवेळ चित्रपट महोत्सव संचालनालय

By Admin | Updated: June 27, 2014 01:35 IST2014-06-27T01:33:58+5:302014-06-27T01:35:39+5:30

सद्गुरू पाटील ल्ल पणजी गोवा हे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) कायमस्वरूपी केंद्र बनल्याने आता चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) गोव्यात पूर्णवेळ काम करील,

Directorate of Full-Time Film Festival in Goa | गोव्यात पूर्णवेळ चित्रपट महोत्सव संचालनालय

गोव्यात पूर्णवेळ चित्रपट महोत्सव संचालनालय

सद्गुरू पाटील ल्ल पणजी
गोवा हे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) कायमस्वरूपी केंद्र बनल्याने आता चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) गोव्यात पूर्णवेळ काम करील, असे संचालनालयाचे संचालक शंकर मोहन यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी सांगितले. त्यांच्याशी झालेला संवाद असा :
ॅ गोवा हे इफ्फीचे कायमस्वरूपी केंद्र बनले आहे याची आपल्याला कल्पना आहे काय? आपल्याला त्याविषयी काय वाटते?
- गोवा हे इफ्फीचे कायमस्वरूपी केंद्र बनेल, असे अपेक्षित होतेच. त्याबाबत आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने निर्णय घेऊन शिक्कामोर्तब केले. चित्रपट महोत्सव संचालनालयाला याची पूर्ण कल्पना आहे. आपल्याला या निर्णयाबाबत आनंद वाटतो; कारण गोवा हे इफ्फीचे कायमस्वरूपी केंद्र बनण्याच्या पूर्ण पात्रतेचे
स्थळ आहे. गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पोषक वातावरण आहे.
ॅ इफ्फी आता गोव्यात स्थिरावणार असल्याने गोव्याला काय लाभ होईल?
- गोव्याला आता इफ्फीचा अधिक लाभ मिळेल. गोवा मनोरंजन संस्था आणि चित्रपट महोत्सव संचालनालयाने संयुक्तपणे यापूर्वी सगळ््या इफ्फींचे आयोजन यशस्वी केले. सुमारे दहा चित्रपट महोत्सव सलग भरविले व दरवेळी दर्जा वाढत गेला. दरवेळी इफ्फीसाठी प्रतिसाद वाढत गेला, हे लक्षात घ्यायला हवे. इफ्फी व गोवा असा ब्रॅण्ड तयार झाला आहे. गोव्यात इफ्फीनिमित्त देशभरातून आणि जगातूनही अनेक कलावंत येऊन जातात. गेल्या वर्षी इफ्फीचे सुमारे १२ हजार प्रतिनिधी नोंद झाले. गोवा आता कायमस्वरूपी केंद्र बनल्याने या पुढील काळात प्रतिनिधींची संख्या आणखी वाढेल. गोव्याच्या पर्यटनासही याचा लाभ होईल.
ॅ गोव्यात चित्रपट महोत्सव संचालनालयाचे कामकाज आता नियमितपणे सुरू होईल काय?
- निश्चितच, गोवा हे कायमस्वरूपी केंद्र बनलेले असल्याने आता डीएफएफचे पूर्ण दर्र्जाचे कार्यालय गोव्यात कायम कार्र्यरत राहिल. येत्या आठवड्यात आपण गोव्यात येत आहे. आपल्यासोबत चित्रपट महोत्सव संचालनालयाची पूर्ण तांत्रिक टीमही येणार आहे. आम्ही गोव्यात पूर्ण दर्र्जाचे कार्यालय सुरू करून वर्र्षभर गोव्यात इफ्फीशीसंबंधित कामे करणार आहोत. इफ्फीच्या आयोजनाशीसंबंधित कामांचा व्याप हा मोठा असतो. आपण स्वत: गोव्यात बसेन. आपली टीमही असेल. इफ्फीसाठी आणखी काही साधनसुविधा गोव्यात उभ्या करायच्या आहेत. गेल्या वर्षी इफ्फीच्या समारोप सोहळ््यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही त्याबाबत घोषणा केली आहे.
ॅ दिल्लीत चित्रपट महोत्सव संचालनालयाचे मुख्यालय असेल काय की तेही बंद होईल?
- मुख्यालय तिथे राहील; कारण केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून इफ्फीसाठी निधी येत असतो. गोव्यात आम्ही तीन टप्प्यांमध्ये कार्यालयाचा विस्तार करू. म्हणजे तीन टप्प्यांमध्ये येथे मनुष्यबळ नियुक्त केले जाईल. येत्या आठवड्यात गोव्यात आमची बैठक होईल. इफ्फीसाठी साधनसुविधा करण्याच्या कामाबाबतही आम्ही सरकारशी व मनोरंजन संस्थेशी समन्वय ठेवू. इफ्फीच्या तयारीच्या कामावर चित्रपट महोत्सव संचालनालयाची देखरेख असेल. महोत्सवासाठी चित्रपटांची निवड करण्याची प्रक्रियाही गोव्यात होईल. चित्रपट महोत्सव संचालनालयाचे दिल्लीत वर्र्षभर विविध उपक्रम सुरू असतात. ते बंद करून गोव्यात अधिक लक्ष दिले जाईल.

Web Title: Directorate of Full-Time Film Festival in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.