दूधसागरात बुडून

By Admin | Updated: September 1, 2014 02:07 IST2014-09-01T02:05:52+5:302014-09-01T02:07:14+5:30

मडगाव/कुळे : ट्रेकिंगसाठी पुण्याहून आलेली चेताली सतीश पाटील (२४, मूळ एरांडवणे, पुणे) या युवतीचा रविवारी (दि. ३१) दूधसागर नदीत बुडून मृत्यू झाला.

Dip in the water | दूधसागरात बुडून

दूधसागरात बुडून

मडगाव/कुळे : ट्रेकिंगसाठी पुण्याहून आलेली चेताली सतीश पाटील (२४, मूळ एरांडवणे, पुणे) या युवतीचा रविवारी (दि. ३१) दूधसागर नदीत बुडून मृत्यू झाला. ती ३२ जणांच्या गटासह दूधसागर येथे ट्रेकिंगसाठी आली होती. तिच्यासोबत तिचा भाऊही होता. कुळे पोलीस स्थानकाचे जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा गट पुण्याहून रविवारी सकाळी ट्रेनने सोनावली-कुळे या ठिकाणी आला. दूधसागर धबधब्याचे दृश्य पाहिल्यानंतर ते दूधसागर धबधब्याच्या खाली दूधसागर नदीच्या बाजूने आले. एका ठिकाणी ते दूधसागर नदी पार करत असताना चेताली पाटील हिचा पाय निसरून ती पाण्यात पडली. पाण्याच्या प्रवाहाचा जोर भरपूर असल्याने ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर ५० ते ६० मीटर वाहत गेली. त्यानंतर ती एका ठिकाणी अडकली.

Web Title: Dip in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.