डिजिटल प्रकल्प वर्षभरात कार्यान्वित: मंत्री सुभाष शिरोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 11:42 IST2025-02-09T11:41:34+5:302025-02-09T11:42:32+5:30
पर्वरी येथील विधानसभा संकुलात बैठक

डिजिटल प्रकल्प वर्षभरात कार्यान्वित: मंत्री सुभाष शिरोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील सहकार प्रकल्प व सहकार संस्था निबंधकांनी हाती घेतलेल्या विविध डिजिटल प्रकल्पांची येत्या आर्थिक वर्षांत अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी यासंबंधी आढावा बैठक घेतली.
पर्वरी येथील विधानसभा संकुलात शुक्रवारी ही बैठक झाली. विविध डिजिटल प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी त्याबाबतच्या प्रक्रियेला गती द्यावी. जेणेकरून नागरिकांना सहकार क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा वेळेत मिळतील. तसेच एकूणच राज्याच्या हिताच्या दृष्टीने हे प्रकल्प वेळेत कार्यान्वित करावेत, डिजिटल प्रकल्पाची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षात करण्यावर भर द्यावा, असे निर्देश यावेळी मंत्र्यांनी बैठकीत दिले. या बैठकीत डिजीटल क्षेत्रासंबंधी सर्वांच्या सूचना लक्षात घेण्यात आल्या व त्याची अंमलबजावणी करण्याचे मंत्र्यांनी निर्देश दिले.
या बैठकीला एनआयसी, नवी दिल्लीचे, उपमहासंचालक प्रशांत कुमार मित्तल, राज्य माहितीशास्त्र अधिकारी, समीर पी. दातार शास्त्रज्ञ जे. एस. रोझारियो, शास्त्रज्ञ एस. सेंथिल नायगम, सहकार निबंधक कबीर शिरगावकर, सहायक सहकार निबंधक रूपेश कोरडे उपस्थित होते.
बैठकीतील ठळक मुद्दे
संगणकीकरण प्रक्रियेमुळे व्यवस्थापनात अचूकता आणि राज्यातील सहकार क्षेत्रातील एकूण कारभारात आणि व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा
एनआयसीच्या सहकार्याने लवकरच त्याच्या एकात्मिक डिजिटल पोर्टलची सेवा
पोर्टलमुळे सहकारी संस्थांना ऑनलाइन व्यवहार व सेवा देणे सोपे होणार
केंद्रीय सहकारमंत्री अमित शाहाजी यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्र मजबूत करणे
ग्रामीण विकासाला चालना देणे आणि शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुधारण्याचे उद्दिष्ट.