रोजगाराशिवाय विकास देशाला मारक : भादुरी
By Admin | Updated: August 27, 2014 01:30 IST2014-08-27T01:30:36+5:302014-08-27T01:30:50+5:30
पणजी : रोजगाराशिवाय विकास देशाला मारक ठरेल, असे भाष्य गोवा विद्यापीठाच्या दयानंद बांदोडकर अध्यासनाचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ प्रा. अमित भादुरी यांनी केले.

रोजगाराशिवाय विकास देशाला मारक : भादुरी
पणजी : रोजगाराशिवाय विकास देशाला मारक ठरेल, असे भाष्य गोवा विद्यापीठाच्या दयानंद बांदोडकर अध्यासनाचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ प्रा. अमित भादुरी यांनी केले. स्थानिक बाजारपेठेसाठी उत्पादन करा, आंतरराष्ट्रीय नव्हे, असे ते म्हणाले.
‘भारताची गरज असलेले विकासाचे मॉडेल’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. इंटरनॅशनल सेंटर व गोवा विद्यापीठाने संयुक्तरीत्या या चर्चासत्राचे आयोजन केले होते.
ते म्हणाले, आज विकास दर ७ ते ८ टक्के आहे, तर रोजगार दर केवळ १ टक्का आहे. टाटा स्टीलसारख्या कंपनीने रोजगार कपात करून उत्पादन पाच पटीने वाढविले. बजाज, किर्लोस्कर यांसारख्या कंपन्यांनीही हेच केले; परंतु ते देशाच्या कितपत हिताचे आहे, याचाही विचार करण्याची गरज आहे. पंचायती, जिल्हा पंचायती, पालिका आदींवर ३५ लाख लोकप्रतिनिधी आहेत. त्यातील १0 टक्के जरी कार्यक्षम बनले तरी पुरेसे आहे. सार्वजनिक कंपन्या कार्यक्षम बनवा, असे आवाहन त्यांनी केले.
इंटरनॅशनल सेंटरच्या संचालिका नंदिनी सहाय उपस्थित होत्या. विद्यापीठाचे प्राध्यापक एम. के. जनार्दनन यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. (प्रतिनिधी)