सुभाष वेलिंगकर यांना हद्दपार करा; म्हापशात ख्रिस्ती समाजासह नागरिकांचे पोलिसांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2024 11:58 IST2024-10-08T11:57:49+5:302024-10-08T11:58:52+5:30
जॉन लोबो, फ्रान्सिस फर्नांडिस तसेच इतरांचा समावेश होता.

सुभाष वेलिंगकर यांना हद्दपार करा; म्हापशात ख्रिस्ती समाजासह नागरिकांचे पोलिसांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : आरएसएसचे माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात ख्रिस्ती समाजातील लोकात असलेला रोष म्हापशातही दिसून आला. काही नागरिकांनी काल सकाळी पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक निखील पालेकर यांची भेट घेवून वेलिंगकरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.
वेलिंगकर यांनी केलेल्या व्यक्तव्यातून समाजात तेढ निर्माण करण्याचा लोकांत असंतोष निर्माण करण्याचा तसेच शांती बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रश्न गांभीर्याने घेवून त्वरीत कारवाई करण्याची मागणी त्यातून करण्यात आली. शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन सादर केले. यात जॉन लोबो, फ्रान्सिस फर्नांडिस तसेच इतरांचा समावेश होता.