ढवळीकरांना मंत्रीमंडळातून वगळण्याची मागणी
By Admin | Updated: May 8, 2014 01:30 IST2014-05-08T01:22:29+5:302014-05-08T01:30:12+5:30
ढवळीकरांना मंत्रिमंडळातून वगळा

ढवळीकरांना मंत्रीमंडळातून वगळण्याची मागणी
ढवळीकरांना मंत्रिमंडळातून वगळा
ताम्हणकरांची मागणी
पणजी : वाहतूक खात्यातील वाढता भ्रष्टाचार आणि नागरिकांना २४ तास पाणी पुरविण्यात आलेल्या अपयशामुळे मंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जावा, अशी मागणी सुदीप ताम्हणकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
२९ रोजी वाहतूक अधिकार्यांनी कंत्राट पद्धतीवरील बसगाड्या जप्त केल्या होत्या. अधिकार्यांना हप्ते पोहोचविल्यानंतर या बसगाड्या सोडण्यात आल्या, असा आरोप ताम्हणकर यांनी केला. महाराष्ट्रातून अशा प्रकारे कितीतरी बेकायदा बसगाड्या गोव्यात येतात. यावर कोणतीही कारवाई वाहतूक खात्याकडून करण्यात येत नसल्याचेही ते म्हणाले.
ढवळीकर बंधूंच्या मतदारसंघात वीज बिले, सणवारांसाठी लोकांना पैसे वाटण्यात येतात. हे पैसे कुठून येतात याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी ताम्हणकर यांनी केली.
ढवळीकर यांनी यापूर्वी जनतेला काही दिवसांत २४ तास पाणी मिळणार, असे आश्वासन दिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून ढवळीकर उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना एकच आश्वासन देत आहेत. मोठमोठ्या हॉटेल्सना २४ तास पाणीपुरवठा देण्यात येतो, असा आरोपही ताम्हणकर यांनी या वेळी केला. वर्षानुवर्षे काही विशिष्ट गावात पाण्याची मोठी समस्या उद्भवते अशा गावात मुबलक पाणीपुरवठा करू न शकणार्या मंत्र्यांचा सरकारला कोणताही फायदा नसून परिवर्तनाच्या झाडाखाली बसून फळे चाखणार्या ढवळीकर बंधूंना मंत्रिमंडळातून वगळावे, असे ते म्हणाले. भाजपा सरकारने माविन गुदिन्हो यांना त्वरित पक्षात सामावून घ्यावे, अशी मागणी ताम्हणकर यांनी केली. तसेच लोकायुक्त पदावर निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करून लोकायुक्त सक्रिय करण्यात यावे, अशी मागणीही ताम्हणकर यांनी या वेळी केली. (प्रतिनिधी)