गोव्याच्या मिरामार किना-यावरुन कँसिनो जहाज हटविण्यास मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:05 IST2017-09-27T13:52:16+5:302017-09-27T16:05:18+5:30
गोव्याच्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर रुतून राहिलेले लकी ७ कँसिनो जहाज हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने कंपनीला ९ ऑक्टोबरपर्यंत मूदत दिली आहे.

गोव्याच्या मिरामार किना-यावरुन कँसिनो जहाज हटविण्यास मुदतवाढ
पणजी - गोव्याच्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर रुतून राहिलेले लकी ७ कँसिनो जहाज हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने कंपनीला ९ ऑक्टोबरपर्यंत मूदत दिली आहे.
खंडपीठाने कँसिनो जहाज हटविण्यासाठी कंपनीला या पूर्वी २० सप्टेंबर ही मूदत दिली होती. परंतू या मूदतीत जहाज हटविण्यात कंपनीला अपयश आले. या दरम्यानच्या काळात अनेकवेळा जहाज हटविण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न झाले. दोनवेळा जहाज ५० मीटर अंतरावर नेऊन परत आणावे लागले. उधाणाची भरती मिळाल्याशिवाय जहाज हलविणे कठीण असल्याचे कंपनीच्या तज्ज्ञ पथकांचे म्हणणे आहे. उधाणाच्या भरतीसाठी 4 ऑक्टोबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
मंगळवारी खंडपीठापुढे हे प्रकरण सुनावणीसाठी आले तेव्हा जहाज न हटविण्याचे स्पष्टीकरण कंपनीने न्यालयात दिले. न्यायमूर्ती गौतम पटेल व नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने आता ५ ते ९ ऑक्टोबरपर्यंत हटविण्याचा आदेश दिला.