शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गोव्यात म्हादई अभयारण्यात मृत वाघ सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 8:13 PM

म्हादई अभयारण्यात रॉयल बंगाली जातीच्या पट्टेरी वाघाचे (नर)शव कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पणजी : गोव्यात सत्तरी तालुक्यातील गोळावली येथे म्हादई अभयारण्यात रॉयल बंगाली जातीच्या पट्टेरी वाघाचे (नर)शव कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या अभयारण्यात वाघांचे अस्तित्त्व असल्याचे याआधी अनेकदा स्पष्ट झाले आहे. खबर मिळाल्यानंतर वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शव ताब्यात घेतले. या वाघाचे वय ४ वर्षे असावे आणि पाच ते सहा दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे. विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून शवचिकित्सा आज सोमवारी होणार आहे. 

उपवनपाल विकास देसाई यांनी वाघाचा सांगाडा मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. मृत्युचे कारण शवचिकित्सेनंतरच स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. गेल्यावेळी राज्यात व्याघ्रगणाना झाली तेव्हा म्हादई अभयारण्यात वाघाचे अस्तित्त्व स्पष्ट झाले होते. शेजारी भीमगड आणि हंशी-दांडेली अभयारण्यातून वाघ या भागात येतात असा अंदाज व्यक्त केला जात होता.

 ‘राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर करा’- 

पर्यावरणप्रेमी तथा अभ्यासक राजेंद्र केरकर म्हणाले की, ‘या भागात पाच वाघांचे अस्तित्त्व असल्याचे याआधी स्पष्ट झालेले आहे त्यामुळे वन खात्याने पुरेस मनुष्यबळ या अभयारण्यात नियुक्त करणे आवश्यक होते, ते केले नाही. गोळावली गावातील लोक तेथील ‘भुगूत’ या पारंपरिक कार्यक्रमासाठी सकाळी अभयारण्यात गेले होते तेथे सिध्दाच्या गुंफेजवळ त्यांना हा सांगाडा आढळून आला त्यानंतर वन अधिकाºयांना कळविण्यात आले. हा वाघ सुमारे ४ वर्षे वयाचा पट्टेरी वाघ असून नर जातीचा आहे. या अभयारण्यात वाघांचा संचार असल्याने तेथील शेती बागायती वगळून हा भाग राखीव व्याघ्रक्षेत्र म्हणून जाहीर करणे आवश्यक आहे.

लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री असताना त्यांनी तसा प्रस्ताव तयार केला होता परंतु पुढे या गोष्टीला चालना मिळाली नाही. गोळावली भागात काही दिवसांपूर्वी एक गाय आणि म्हैस ठार मारण्यात आली होती वाघानेच त्यांच्यावर हल्ला केला असावा असा संशय आहे. या वाघाचा मृत्यू विषबाधेने झाला असावा, असा क यास असल्याचे केरकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘ अभयारण्याचा हा भाग राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर झाल्यास म्हादईच्या पाण्याबाबतही फार मोठा दिलासा गोवा सरकारला मिळणार आहे.’ दरम्यान, २00९ साली सत्तरीतच एका वाघाला ठार केले होते याचे स्मरणही केरकर यांनी करुन दिले. 

- वन खात्याने २0१६ व २0१७ साली या अभयारण्यांमध्ये काही ठिकाणी कॅमेरे बसविले होते. त्यातून प्राप्त झालेल्या छायाचित्रांव्दारे या भागांमध्ये वाघांचे अस्तित्त्व असल्याचे स्पष्ट झाले होते. कॅमेऱ्यांमुळे वाघांचे अस्तित्त्व स्पष्ट झालेले आहे. गोवा आणि महाराष्ट्राच्या हद्दीच्या भागात खास करुन चोर्ला घाटात वाघांचे अस्तित्त्व दिसून आले होते. त्याआधी २0१३ साली व्याघ्र गणना हाती घेण्यात आली होती परंतु त्यात काहीच निष्पन्न झाले नव्हते. 

- वाघांचे अस्तित्त्व शोधून काढण्यासाठी या अभयारण्यांचे मॅपिंग करण्याचा प्रस्ताव राज्य वन्यप्राणी मंडळासमोर ठेवला जाणार आहे. राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाकडून त्यासाठी निधी मिळवला जाईल.

- मुख्य वन्यप्राणी वॉर्डन संतोष कुमार यांनी शवचिकित्सेनंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होईल, असे सांगितले. उपवनपाल तसेच रेंज फॉरेस्ट अधिकाºयांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. गोळावली भाग पश्चिम घाटाच्या पायथ्याशी आहे.

टॅग्स :Tigerवाघforestजंगलgoaगोवा