शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
4
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
5
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
6
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
7
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
8
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
9
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
10
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
11
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
12
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
13
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
14
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
15
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
16
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
17
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
18
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
19
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
20
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबरा... दिगंबरा... एक सांप्रदायिक जन्मोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:27 IST

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.

मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होतो. दत्त जयंती दिनी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो. दत्त जयंती साजरी करण्याबाबत शास्त्रोक्त विशिष्ट विधी नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह म्हणतात. 

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तमिळनाडूतही दत्त जयंतीची प्रथा आहे. दत्त जयंतीदिनी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो. दत्तयागात पतमान पंचसूक्ताच्या आवृत्त्या (जप) आणि त्याच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत (तूप) आणि तीळ यांनी हवन करतात.

दत्तयागासाठी केल्या जाणाऱ्या जपाची संख्या निश्चित नाही. पुरोहितांच्या समादेशानुसार जप आणि हवन केले जाते.दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरू केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण ज्वालेपासून घेतली. चराचरांतील प्रत्येक वस्तूत ईश्वराचे अस्तित्व पाहाण्यासाठी दत्तगुरूंनी चोवीस गुरू केले.

'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार आणि 'श्री नृसिंह सरस्वती' दुसरा अवतार. 'माणिकप्रभू' तिसरे आणि 'श्री स्वामी समर्थ महाराज' चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे. 

दत्त हा 'गुरुदेव' आहे. दत्तात्रेयांना परमगुरू मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. 'श्री गुरुदेव दत्त', 'श्री गुरुदत्त' असा त्यांचा जयघोष करतात. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे.

दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ असा की झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करून एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.

संकलन : तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था 

English
हिंदी सारांश
Web Title : Digambara Digambara: A Communal Janmotsav (Birth Celebration)

Web Summary : Dattatreya's birth, celebrated on Margashirsha Purnima, involves rituals like Gurucharitra recitation. Key places like Audumbar honor Dattatreya, considered a guru who learned from nature. He embodies humility and tolerance, symbolized by his begging bowl.
टॅग्स :goaगोवाdatta jayantiदत्त जयंतीDatta Mandirदत्त मंदिरshree datta guruदत्तगुरुshree gurucharitraसंपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय