नृत्य महोत्सवांचा आजपासून तडका

By Admin | Updated: December 27, 2014 01:11 IST2014-12-27T01:00:33+5:302014-12-27T01:11:24+5:30

पणजी : देश-विदेशातील हजारो पर्यटकांच्या सहभागाने शनिवारपासून उत्तर गोव्याच्या किनारी भागात दोन इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव सुरू होत आहेत.

Dance festivals tonight | नृत्य महोत्सवांचा आजपासून तडका

नृत्य महोत्सवांचा आजपासून तडका

पणजी : देश-विदेशातील हजारो पर्यटकांच्या सहभागाने शनिवारपासून उत्तर गोव्याच्या किनारी भागात दोन इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव सुरू होत आहेत. कांदोळी-वागातोर ते अंजुणाच्या पट्ट्यात होणाऱ्या या नृत्य महोत्सवात जोरदार संगीताच्या तालावर अखंडितपणे हजारो पर्यटक नृत्य करणार आहेत.
पोलिसांनी किनारपट्टीत बंदोबस्त वाढवला आहे. तटरक्षक दल व नौदलानेही बंदोबस्त वाढविल्याचे सांगण्यात येते. महोत्सवामुळे बार्देस तालुक्याच्या किनारपट्टीत पर्यटकांची संख्या वाढलेली पाहायला मिळेल. परसेप्ट लिमिटेड कंपनीकडून गेली आठ वर्षे सनबर्न महोत्सवाचे आयोजन केले जाते. सनबर्न महोत्सव दि. ३० रोजीपर्यंत, तर सुपरसोनिक महोत्सव दि. २९ रोजीपर्यंत चालणार आहे. अनेक तरुण व तरुणी या
महोत्सवात भाग घेतात. ५,००,००० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत वागातोर येथे सनबर्न महोत्सव होतो.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Dance festivals tonight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.