मुंबईस्थित तृतीयपंथी संस्थेतील अध्यक्षांच्या घराची मोडतोड

By काशिराम म्हांबरे | Updated: June 26, 2023 22:42 IST2023-06-26T22:42:35+5:302023-06-26T22:42:44+5:30

संशयितांनी वैयक्तिक वादातून घटनेच्या दिवशी तक्रारदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला

Damage to the house of the president of a Mumbai-based tertiary institution | मुंबईस्थित तृतीयपंथी संस्थेतील अध्यक्षांच्या घराची मोडतोड

मुंबईस्थित तृतीयपंथी संस्थेतील अध्यक्षांच्या घराची मोडतोड

म्हापसा- पर्रा येथे राहणा‍ऱ्या तृतीय पंथियांच्या एका संस्थेच्या अध्यक्षांच्या घराची व दुचाकीची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित फैयाझ उर्फ बॉबी व जीनिया (दोघेही राहणार- कळंगुट) या दोघा तृतीय पंथियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, हा प्रकार गेल्या १५ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडला.  तक्रारदार साल्मा खान साखरकर ही मुंबईस्थित किन्नर माँ एक सामाजिक संस्था ट्रस्ट या संस्थेच्या अध्यक्षा. सिल्वावाडो पर्रा येथे या संस्थेची शाखा असून तेथेच त्या वास्तव्यास असतात.

वरील संशयितांनी वैयक्तिक वादातून घटनेच्या दिवशी तक्रारदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच मुख्य दरवाजा आणि दुचाकीची मोडतोड केली. याशिवाय फिर्यादी व इतरांना गंभीर परिणामांची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी भादंसंच्या ४५१, ४२७, ५०६(२) व ३४ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. म्हापसा पोलिसांच्या वतिने तपास सुरु करण्यात आला आहे.

Web Title: Damage to the house of the president of a Mumbai-based tertiary institution