शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
3
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
4
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
5
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
7
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
8
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
9
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
10
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

दाबोळी विमानतळावर सीमाशुल्क विभागाने आतापर्यंत केले ३ किलो ८७७ ग्रॅम तस्करीचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 2:58 PM

यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिने (३१ मार्च २०२०) राहिलेल आहेत.

- पंकज शेट्येलोकमत न्यूज नेटवर्कवास्को: यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून (१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२०) अजूनपर्यंत गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील सीमाशुल्क (कस्टम) विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच वेगवेगळ््या प्रकरणात विदेशातून गोव्यात येणाºया प्रवाशांकडून ३ कीलो ८७७ ग्रॅम तस्करीचे सोने जप्त केले. याची एकूण किंमत १ कोटी १६ लाख ९६ हजार ३३८ रुपये आहे. या आर्थिक वर्षात दाबोळी विमानतळावरून विविध विदेशी चलने बेकायदा नेण्याचा प्रयत्न करणारे एकही प्रकरण पकडण्यात आलेले नाही. सीमाशुल्क विभागाने मागच्या आर्थिक वर्षात (२०१८ - २०१९) १९ प्रकरणांत विदेशातून गोव्यात आलेल्या प्रवाशांकडून ९ कीलो १९५ ग्रॅम तस्करीचे सोने पकडले होते. त्याची किंमत २ कोटी ५९ लाख ४४ हजार ५२६ रुपये होती. तसेच मागच्या आर्थिक वर्षात ६ प्रकरणांत विदेशी चलने नेणाऱ्यांवर कारवाई करून ७७ लाख ४७ हजार ६३७ (भारतीय दरानुसार) रुपये जप्त केले होते.यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिने (३१ मार्च २०२०) राहिलेल आहेत. येणाºया काळात आणखीन केवढी तस्करीची प्रकरणे पकडून कीती सोने जप्त करण्यात येईल हे नंतर स्पष्ट होईल. दाबोळी विमानतळावर यावर्षी विविध प्रकारे तस्करीचे सोने नेण्याचे प्रयत्न प्रवाशांनी केल्याचे दिसून आले. मात्र, सतर्क असलेल्या अधिकाºयांनी त्यांचे हे प्रयत्न फोल ठरवले. २१ जुलै २०१९ रोजी दाबोळी विमानतळावर येणाºया काही प्रवाशांशी तस्करीचे सोने असल्याची पूर्व माहिती अधिकाºयांना मिळताच त्यांना गजाआड करण्यासाठी येथे खडा पहारा ठेवला होता. या तस्करीचे सोने कझाकीस्थानमधून दुबईमार्गे विमानातून दाबोळी विमानतळावर घेऊन येणार, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली होती. यानुसार तेव्हाचे दाबोळी विमानतळावरील सीमाशुल्क सहाय्यक आयुक्त राघवेंद्र पी. यांच्या मार्गदर्शनाखाली सीमाशुल्क अधिकाºयांनी विदेशातून येणाºया प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवण्यास सुरवात केली.दुबईहून दाबोळी विमानतळावर एअर इंडिया विमानातील प्रवाशांची सीमाशुल्क अधिकाºयांनी तपासणी सुरू केली तेव्हा त्यांना कझाकीस्थानमधील तीन महीलांच्या हालचालीवरुन संशय आला. यामुळे या तीन विदेशी प्रवाशंची सीमाशुल्क अधिकाºयांनी कसून तपासणी केली तेव्हा त्यांच्याकडून तस्करीचे सोने आणल्याचे सिध्द झाले. तिन्ही महिलांनी त्यांच्या अंतर्वस्त्रात तसेच साहित्यात १ कीलो ७८७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने लपवून आणले होते. या दागिन्यांची किंमत ५८ लाख ३८ हजार होती. या कारवाईच्या दोन महिन्यांपूर्वी २१ मे २०१९ रोजी कारवाई करुन विदेशातून गोव्यात आलेल्या अन्य एका प्रवाशाकडून १ कीलो ६३० ग्रॅम वजनाचे तस्करीचे सोने जप्त केले होते. मस्कतहून गोव्यात येणार असलेल्या विमानातून एक प्रवासी तस्करीचे सोने घेऊन येणार होता. एका प्रवाशाला बाजूला घेऊन त्याची कसून तपासणी केली असता त्याने पेस्ट पध्दतीने तस्करीचे सोने आणल्याचे उघड झाले. त्यांच्या कमरेवर बांधलेल्या बेल्ट तसेट बूटात लपवून आणल्याचे या वेळी स्पष्ट झाले. त्यांच्याकडून पेस्ट पद्धतीने आणलेले १ किलो ६३० ग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची किंमत ४८ लाख ४७ हजार ७३४ होती. या दोन मोठ्या कारवायांबरोबरच अन्य तीन कारवायांत मिळून यंदाच्या आर्थिक वर्षात अजूनपर्यंत १ कोटी १६ लाख ९६ हजार ३३८ रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले आहे.सोन, विदेशी चलने प्रकरणी कारवाई२०१६-२०१७ या आर्थिक वर्षात दाबोळी विमानतळावरील ८ वेगवेगळ््या प्रकरणात १९ किलो ७३६ ग्रॅम तस्करीचे सोने जप्त केले होते. जप्त केलेल्या तस्करीच्या सोन्याची किंमत ५ कोटी ४२ लाख ९९ हजार ६१९ होती. ५ प्रकरणांत दाबोळी विमानतळावरुन विदेशी चलने नेणाºयांवर कारवाई करुन १ कोटी ७ लाख ६३ हजार ६८७ रुपंयाची विदेशी चलने जप्त केली होती. २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात १७ प्रकरणांत १३ किलो १६२ ग्रॅम तस्करीचे सोने प्रवाशांकडून जप्त केले. त्याची किंमत ३ कोटी ७५ लाख ३७ हजार २३५ होती. तसेच ४ प्रकरणात १ कोटी ३४ लाख ४२ हजार ८२९ रुपयांची विदेशी चलने जप्त केली होती. २०१८- २०१९ या आर्थिक वर्षात १९ प्रकरणांत कारवाई करुन ९ किलो १९५ ग्रॅम तस्करीचे सोने जप्त केले. त्याची किंमत २ कोटी ५९ लाख ४४ हजार ५२६ रुपये होती. ६ प्रकरणांत ७७ लाख ४७ हजार ६३७ रुपयांची विदेशी चलने जप्त करण्यात आली होती.साहाय्यक आयुक्त म्हणतात.....या अर्थिक वर्षाच्या काळात अजूनपर्यत दाबोळी विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईबाबत साहाय्यक आयुक्त राघवेंद्र पी. यांच्याशी चर्चा केली. राघवेंद्र पी. यांची सुमारे दोन आठवडयांपूर्वी मुरगाव बंदरातील सीमाशुल्क विभागात बदली झाली आहे. दाबोळी विमानतळावर सोन्याच्या तस्करी प्रकरणात केलेल्या कारवाईत सीमाशुल्क आयुक्त मिहीर राजन यांचा पूर्ण पाठिंबा तसेच मार्गदर्शन सीमाशुल्क अधिकाºयांना मिळालेले असल्याचे चर्चेच्या वेळी सांगितले.

टॅग्स :GoldसोनंSmugglingतस्करी