शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात समुद्राला उधाण, पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 15:38 IST

वायू चक्रीवादळाने जरी गोव्यापासून आपली पाठ वळवली असली तरी या वादळाच्या परिणामामुळे गोव्यातील समुद्र बुधवारीही खवळलेल्या अवस्थेतच होते.

मडगाव - वायू चक्रीवादळाने जरी गोव्यापासून आपली पाठ वळवली असली तरी या वादळाच्या परिणामामुळे गोव्यातील समुद्र बुधवारीही खवळलेल्या अवस्थेतच होते. आपली नेहमीची पातळी ओलांडून समुद्राचे पाणी अगदी काठावर आल्याने पर्यटकांनी कुठल्याही परिस्थितीत पाण्यात उतरु नये असा इशारा त्यांना देण्यात आला होता.सोमवारी रात्री समुद्राचे पाणी वर येऊ लागल्याने किनारपट्टी भागात काहीसे घबराटीचे वातावरण पसरले होते. दक्षिण गोव्यातील पाळोळे, गालजीबाग, बाणावली, कोलवा, बोगमोळो या गजबजलेल्या किना:यावर सुरक्षेचे उपाय घेण्याच्या सुचना जिल्हाप्रशासनाने जारी केला होता.बोगमोळो-वास्को येथे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून मंगळवारी रात्री अगदी रस्त्याजवळ पाणी आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. समुद्र किना-याजवळ असलेल्या काही हॉटेलांतही पाणी घुसल्याने सर्वाची तारांबळ उडाली. सध्या मासेमारी बंद असल्याने मासेमा:यांनी आपल्या होडय़ा किना:यावर आणून ठेवल्या होत्या. मात्र खवळलेल्या दर्यामुळे या होडय़ांची बरीच नुकसानी झाली.उत्तर गोव्यातही यामुळे तडाखा बसला. उत्तर गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्र किनारा असलेल्या हरमल किना-यावर दर्याच्या पाण्याची पातळी वाढून वेगाने लाटा किना:यावर धडकल्या आणि त्यामुळे किना-यावरील काही हॉटेलातही पाण्याचे लोट आत शिरले.दरम्यान, बुधवारी दुपारी पुन्हा एकदा सोसाटय़ाचा वारा सुरु झाल्याने दक्षिण गोव्यातील कुडचडे परिसरात मोठय़ा प्रमाणावर झाडे उन्मळून पडली. काही झाडे घरांवर पडल्याने मोठया प्रमाणात नुकसानी झाली. वादळी वा:यामुळे वीज यंत्रणोतही बिघाड झाल्याने मंगळवारी रात्री अर्धा गोवा अंधारात होता.

 

टॅग्स :goaगोवाCyclone Vayuवायू चक्रीवादळ