सायबर गुन्ह्यांपासून प्रगतीला, सुरक्षिततेला धोका: मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: December 2, 2022 17:19 IST2022-12-02T17:19:03+5:302022-12-02T17:19:27+5:30

सायबर गुन्हे देशाच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षिततेला धोकादायक आहेत. सोशल मीडियाच्या गोपनीयतेच्या समस्यांकडे गंभीरपणे पहावे लागेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी केले

Cyber crime threatens progress, security: Chief Minister | सायबर गुन्ह्यांपासून प्रगतीला, सुरक्षिततेला धोका: मुख्यमंत्री

सायबर गुन्ह्यांपासून प्रगतीला, सुरक्षिततेला धोका: मुख्यमंत्री

पणजी :

सायबर गुन्हे देशाच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षिततेला धोकादायक आहेत. सोशल मीडियाच्या गोपनीयतेच्या समस्यांकडे गंभीरपणे पहावे लागेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी केले सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी सायबर योद्धे तयार करणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. बीट्स पिलानी कॅम्पसमध्ये माहिती सुरक्षा, गोपनीयता आणि डिजिटल फॉरेन्सिक्स  या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला त्यांनी संबोधले.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'सोशल मीडियाच्या गोपनीयतेच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याचे महत्त्व कमी लेखले जाऊ शकत नाही. या आव्हानांसाठी कुशल तज्ञांची गरज आहे. सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडबद्दल जागरुकता, ज्ञान आणि कौशल्ये आणि सायबर सुरक्षा तसेच संगणक न्यायवैद्यकशास्त्राच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आवश्यक आहे.'

मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार ५२,९७४ सायबर गुन्हे एकूण नोंदवले गेले आहेत, जे २०२० च्या तुलनेत नोंदणीमध्ये ५.९ टक्क्यांनी वाढ दर्शविते. २०२१ मध्ये सायबर गुन्ह्यांपैकी ६०.८ टक्के गुन्हे फसवणुकीचे होते.८.६ टक्के गुन्हे लैंगिक शोषण आणि ५.४ टक्के खंडणीचे होते.

सावंत म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात इंटरनेट आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या सकारात्मक बाजुही स्पष्ट झालेल्या आहेत. इंटरनेटने लोकांना जोडलेले राहण्यास, पेमेंट करण्यास, आवश्यक वस्तू खरेदी करण्यास आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे त्यांचे काम करण्यास मदत केली.'

Web Title: Cyber crime threatens progress, security: Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.