गोव्यावर सायबर हल्ला
By Admin | Updated: November 18, 2014 02:07 IST2014-11-18T01:55:08+5:302014-11-18T02:07:39+5:30
सहा अधिकृत वेबसाईट हॅक : पॅलेस्टिनी गटांवर संशय

गोव्यावर सायबर हल्ला
पणजी : सायबर गुन्हेगारांकडूनही गोवा लक्ष करण्यात आल्याचे संकेत मिळाले असून गोवा सरकारच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मिळून आणखी सहा अधिकृत वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत.
हॅक करण्यात आलेल्या वेबसाईटस््मध्ये महसूल खात्याची भू-नोंदणी विषयक, मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाची, माहिती हक्क कायद्याची, नागरी पुरवठा खात्याची व मडगाव नगरपालिकेच्या वेबसाईट्सचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी या वेबसाईट्स हॅक झाल्याचे उघडकीस
आले.
एकाचवेळी सहा वेबसाईट्स हॅक करून गोवा हे आता सायबर लक्ष्य बनल्याचेही संकेत देण्यात आले आहेत. यापूर्वी राजभवनची वेबसाईट पाकिस्तानी हॅकर्सकडून हॅक करण्यात आली होती. तसेच गोवा माहिती आणि प्रसिद्धी खात्याची व गोवा मलनिस्सारण विभागाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती.