दिवाळीत खरेदीसाठी पणजीत उसळली ग्राहकांची गर्दी : ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:27 IST2023-11-11T15:24:46+5:302023-11-11T15:27:43+5:30

पणजीमध्ये दिवाळीनिमित्त मुख्य बाजारामध्ये ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे.

Customers rush to Panaji for Diwali shopping traffic jams at places | दिवाळीत खरेदीसाठी पणजीत उसळली ग्राहकांची गर्दी : ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

दिवाळीत खरेदीसाठी पणजीत उसळली ग्राहकांची गर्दी : ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

पणजी: दिवाळी निमित्त आज पणजी राजधानीत मुख्य बाजारामध्ये  ग्राहकांची तुडुंब गर्दी पहायला मिळाली. मिठाई, दिवे, आकाशकंदील तसेच अन्य विविध साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी  केली होती. पणजी मुख्य मार्केट प्रमाणे राज्यातील सर्व महत्वाच्या मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी होती.

वाहतूक कोंडी:

आज पणजीत मोठ्या प्रमाणात ग्रहकांनी गर्दी केल्याने पणजी शहरात मार्केटमध्ये वाहतूक कोंडी झाली. दिवसभर लोकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने गाड्या पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. पणजी मार्केटमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी  वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. पणजी मुख्य बाजारामध्ये  ऐरव्ही गाड्या  पार्क करण्यासाठी जागेची कमतरता  असते. यामुळे लोकांना आता चारचाकी गाड्या दूर पार्क करुन बाजारात यावे लागले. लोकांनी तर आपली वाहने दूर जागा मिळेल तिथे पार्क करुन बाजारामध्ये साहित्य खरेदी केले.

नरकासुर पाहण्यासाठीही गर्दी: 
दिवाळी निमित्त पणजीत ठिकठिकाणी मोठमोठे नरकासुर केले असल्याने ते पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. आज रात्री नरकासनूर प्रमिता मिरवणूक होणार तर उद्या पहाोदहन होणार असल्याने आज दिवसभरापासून लोकांनी नरकासुर पाहण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. राज्यभरातून लोक या नरकासुराच्या आक्राळ विक्राळ प्रतिमा पाहण्यासाठी गर्दी करायला सुरवात केली आहे. आज रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.यासाठी बहुतेक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाेलीस तैनात केले आहेत.

Web Title: Customers rush to Panaji for Diwali shopping traffic jams at places