उशीने दाबले नाक; दोरीने आवळला गळा

By Admin | Updated: February 5, 2015 01:38 IST2015-02-05T01:34:55+5:302015-02-05T01:38:25+5:30

पणजी : मांगोर हिल-वास्को येथील दुहेरी खून प्रकरणाचे अनेक धक्कादायक कंगोरे आता पुढे येत आहेत.

Cushioned nose; Rug | उशीने दाबले नाक; दोरीने आवळला गळा

उशीने दाबले नाक; दोरीने आवळला गळा

पणजी : मांगोर हिल-वास्को येथील दुहेरी खून प्रकरणाचे अनेक धक्कादायक कंगोरे आता पुढे येत आहेत. सुडाच्या भावनेने पेटून उठलेल्या प्रतिमा नाईकने सासू उषाला दोरीने गळा आवळून, तर जाऊ नेहाला नाकावर
उशी दाबून धरून ठार केले. तशी कबुली प्रतिमाने पोलिसांसमोर दिली. अत्यंत नियोजनबद्धरीत्या व थंड डोक्याने तिने हे खून तर केलेच; शिवाय पुरावे नष्ट करून स्वत: नामानिराळी भासविण्याचे कारस्थानही व्यवस्थितपणे रचले. या प्रकरणी तिच्या बहिणीचा नवरा अभिजित कोरगावकर याचाही सहभाग असल्याचे आढळल्याने त्यालाही सहआरोपी करून अटक केली आहे.
सासू आपल्याला अत्यंत हीन वागणूक, तर जाऊ नेहाला चांगली वागणूक देते. आपल्या स्वैर वागण्यालाही सासूचा वारंवार आक्षेप असतो. माझे सर्व स्वातंत्र्यच हिरावून घेतले होते. म्हणून आपण दोघींचाही खून केल्याची कबुली प्रतिमाने पोलिसांना दिली आहे. पोलिसांच्या निष्कर्षानुसार खुनाची अनेक कारणे आहेत. त्यात पोलिसांनी अधिकृतपणे जाहीर केलेले कारण हे संशयिताच्या कबुलीनुसार, आपल्यावर निर्बंध घालणाऱ्या सासू आणि जावेवर सूड उगविणे हे आहे; परंतु प्रतिमाचे रंगेल चारित्र्यच तिच्यावरील निर्बंधांसाठी कारणीभूत ठरले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना तिच्या प्रियकराबाबत माहिती मिळाली. याच प्रियकराच्या मदतीने ती घरातून चोरीही करत होती. तिच्या गुन्ह्यांची सुरुवातच अनैतिक संबंधांतून सुरू झाली होती, अशी माहिती एका तपास अधिकाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Cushioned nose; Rug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.