लोकमत न्यूज नेटवर्क, साळगाव : गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेशी निगडित साळगाव महोत्सव २०२६ चा काल रविवारी उत्साहात शुभारंभ झाला. या सोहळ्यात स्थानिक, पर्यटक आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून एकात्मता आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
उद्घाटन सोहळा पारंपरिक दिंडीने झाला. पारंपरिक वेशभूषेत सजलेली दिंडीने टाळ-मृदंगाच्या गजरात संपूर्ण परिसरातून मार्गक्रमण केले. त्यानंतर सादर झालेल्या ढोल-ताशा वादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत कार्यक्रमाला ऊर्जा आणि उत्साहाची नवी उंची दिली.
कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची देण्यासाठी गणेश वंदना आणि प्रभावी शिवतांडव नृत्य सादर करण्यात आले. सायंकाळी अभंग रिपोस्टने भक्ती आणि संगीताचा सुंदर संगम साधत वारकरी परंपरेचा वारसा प्रभावीपणे मांडला.
याप्रसंगी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा साळगावचे आमदार केदार नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, उत्तर गोवा जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा बांदोडकर, गिरी पंचायतीचे सरपंच कल्पेश नाईक, पिळर्णचे उपसरपंच अजय गोवेकर, भाजप साळगाव अध्यक्ष गौरेश मडकईकर, जीटीडीसीचे महाव्यवस्थापक (मार्केटिंग) ग्रॅविन डायस, उपमहाव्यवस्थापक (मार्केटिंग) दीपक नार्वेकर तसेच जीटीडीसीचे अधिकारी, विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजातील ऐक्य वाढणार
आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि प्रसार तसेच समाजातील ऐक्य वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आनंद होत आहे. भविष्यात हा महोत्सव गोव्याच्या एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून अधिक बळकट होईल, असा विश्वास आमदार नाईक यांनी व्यक्त केला. जीटीडीसीचे उत्कृष्ट नियोजन, स्थानिक संस्थांचे सहकार्य आणि नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग यामुळे महोत्सवाचा पहिला दिवस यशस्वी ठरला. पुढील दिवसांत विविध सांस्कृतिक, संगीत आणि पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात होणार असून साळगावची सांस्कृतिक ओळख यामुळे अधिक ठळक होणार आहे.
Web Summary : Salgao Festival 2026 commenced in Goa, blending culture and spirituality. The event featured traditional processions, music, dance, and the participation of dignitaries. Aiming to preserve cultural heritage and promote unity, the festival promises diverse programs and strengthens Salgao's cultural identity.
Web Summary : गोवा में साळगाव महोत्सव 2026 का शुभारंभ, संस्कृति और आध्यात्मिकता का मिश्रण। पारंपरिक जुलूस, संगीत, नृत्य और गणमान्य व्यक्तियों की भागीदारी हुई। सांस्कृतिक विरासत को संरक्षित करने और एकता को बढ़ावा देने के उद्देश्य से, महोत्सव विविध कार्यक्रमों का वादा करता है और साळगाव की सांस्कृतिक पहचान को मजबूत करता है।