शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

गोव्यात पर्यटकांची गर्दी, समुद्र किनारे गजबजले पाहुण्यांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 13:15 IST

गोव्यात सर्वत्र पर्यटकांची मोठी वर्दळ दिसत असून सध्या गोव्यामध्ये सुमारे एक लाखाहून अधिक देशी पाहुणे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पणजी- गोव्यात सर्वत्र पर्यटकांची मोठी वर्दळ दिसत असून सध्या गोव्यामध्ये सुमारे एक लाखाहून अधिक देशी पाहुणे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. किनारे, चर्च आणि मंदिरं, धबधबे त्याचबरोबर जलसफर घडवून आणणाऱ्या क्रुझ बोटी , कॅसिनोमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे. 

दिवाळीच्या सुट्टीमुळे देशी पर्यटकांनी राज्यात मोठी गर्दी केली आहे. गुजराती पर्यटकांची संख्या जास्त असल्याचे जाणवते. गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचा माहोल असल्याने तेथील लोकांनी सहली काढल्या असाव्यात. सोमवारी जुने गोवे येथील सेंट झेविअर चर्च परिसरात पर्यटकांची इतकी गर्दी होती की त्यामुळे वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली. जुने गोवे तसेच राजधानी पणजी शहरात वाहतूक कोंडी ही या दिवसात नित्याचीच बाब बनली आहे.

१५ लाख लोकसंख्या असलेल्या या राज्यात रविवार, सोमवार या दोन दिवसात किमान दीड लाख पर्यटक होते, असे अधिकृत आकडा सांगतो. सोमवारी रात्री पर्यटकांची येथील दयानंद बांदोडकर मार्गावर असलेल्या कसिनो कार्यालयांच्या काऊंटरवर प्रवेशिका खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. पणजीत सांतामोनिका जेटीवर जलसफरी घडवून आणणाºया बोटींवर सायंकाळनंतर गर्दी होते. बोटींची तिकिटे मिळवण्यासाठी जेटीवर रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत जलसफरी चालू होत्या आणि पर्यटक या बोटींवर नाचगाण्याचा आनंद लुटत होते.

कसिनोंबाबत उत्कंठा, कुटुंबीयांसह भेटकळंगुट, बागा, हणजुण, कोलवा, बेतालभाटी किनाऱ्यांवर बोटिंग, पॅराग्लाइडिंग तसेच जलक्रीडांसाठी गर्दी दिसून येते. केवळ किनाऱ्यांवरच नव्हे तर अन्य पर्यटनस्थळांवरही पर्यटक मोठ्या संख्येने दिसून येतात. सकाळी मंदिरे, चर्च आदी धार्मिक स्थळांना भेटी द्यायच्या आणि संध्याकाळी किनाऱ्यांवर जायचे, जलसफरी करायच्या आणि कसिनोंना भेट द्यायची असा सर्वसाधारणपणे कार्यक्रम असतो. कसिनो काय हे पाहण्यासाठी उत्सुकता असलेले देशी पर्यटक कुटुंबाला घेऊन कसिनोंना भेट देतात. दुधसागर धबधबा, हरवळे धबधबा या ठिकाणीही भेट दिली जाते.

हंगामाची सुरवात बऱ्यापैकी : संचालकपर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हंगामाची सुरवात बऱ्यापैकी झालेली आहे. गेल्या वर्षी ६३ लाख देशी पर्यटकांनी भेट दिली होती. यंदा हा आकडा त्यापेक्षा अधिक असेल, असे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. हॉटेलांमध्ये उतरणाऱ्या पर्यटकांची नोंद होते परंतु अनेक पर्यटक असे आहेत की रेंट ए बाइक किंवा स्वत:च्या वाहनांनी दिवसभरात गोवा फिरतात आणि रात्री उशिरा परततात. त्यांची नोंद होत नाही त्यामुळे प्रत्यक्षात हा आकडा आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबर रोजी रशियाहून ५२५ पाहुण्यांना घेऊन पहिले चार्टर विमान दाखल झाले त्यानंतर ही काहीच चार्टर विमाने गोव्यात आलेली आहेत. सध्या गर्दी दिसते आहे देशी पर्यटनाची असून पुढील काही दिवसात त्या गर्दी मध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

सर्वत्र हॉटेल्स फुल्लअखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी अशी माहिती दिली केली राज्यातील मध्यम आणि लहान हॉटेलांच्या खोल्या या दिवसात शंभर टक्के फुल्ल आहेत. पर्यटक आता ऑनलाइन आरक्षण करतात. धोंड यांचे पणजीत ‘मनोशांती’ नावाचे हॉटेल आहे. सोमवारी रात्री आपल्या हॉटेलमध्ये एकही खोली रिकामी नव्हती, असे त्यांनी सांगितले. गुजरातच्या पर्यटकांची संख्या जास्त असल्याचे ते म्हणाले. या पर्यटकांचे गोव्यातील वास्तव्य सरासरी दोन ते तीन दिवस असते त्यानंतर ते घरी परततात, असे ते म्हणाले.

कळंगुटचे आमदार उपसभापती मायकल लोबो म्हणाले की, किनाऱ्यांवर कपडे बदलण्यासाठी ‘चेंजिंग रुम’ तसेच अन्य सुविधा उपलब्ध करण्यावर सरकारने भर दिला. पार्किंगची मोठी समस्या येथे होती ती बऱ्याच प्रमाणात दूर झाली आहे. त्यामुळे आज हजारोंच्या संख्येने पर्यटक कळंगुटला दाखल झाले तरी पूर्वीसारखा वाहतुकीच्या कोंडीचा परिणाम होत नाही.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन