पवित्र शवप्रदर्शनास दुसऱ्या दिवशीही गर्दी
By Admin | Updated: November 24, 2014 01:29 IST2014-11-24T01:23:55+5:302014-11-24T01:29:05+5:30
पणजी : जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शनास रविवारी दुसऱ्या दिवशीही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून दर्शन घेतले. सुट्टीचा दिवस असल्याने स्थानिकांचीही बरीच गर्दी होती.

पवित्र शवप्रदर्शनास दुसऱ्या दिवशीही गर्दी
पणजी : जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शनास रविवारी दुसऱ्या दिवशीही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून दर्शन घेतले. सुट्टीचा दिवस असल्याने स्थानिकांचीही बरीच गर्दी होती.
सोमवारपासून नोव्हेना (प्रार्थना) चालू होणार असून २ डिसेंबर रोजी फेस्ताच्या पूर्वसंध्येपर्यंत नऊ दिवस त्या चालणार असल्याने या काळात भाविकांची गर्दी वाढणार आहे. पवित्र शवप्रदर्शनासाठी मोठ्या रांगा दिसत होत्या. अन्य राज्यांमध्ये तसेच विदेशात नोकरी-धंद्यानिमित्त स्थायिक झालेले गोमंतकीय ‘गोंयच्या सायबा’चे दर्शन आणि ३ डिसेंबरचे फेस्त असा योग साधून येत आहेत, त्यामुळे पुढील काही दिवस जुने गोवेत भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाविकांसाठी त्यांच्या भाषेत प्रार्थनासभांची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय तसेच विदेशी भाषांमध्ये होणाऱ्या प्रार्थनासभांमध्ये भाविक भाग घेऊ शकतात. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा जन्म स्पेनमध्ये झालेला असल्याने फेस्तादिवशी ३ डिसेंबर रोजी स्पेन भाषेत खास प्रार्थनांचे आयोजन आहे. (प्रतिनिधी)