'अभंग रिपोस्ट'ला डिचोलीत गर्दी; संतपरंपरा व संस्कृती जपण्याचा दिला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 08:47 IST2026-04-11T08:47:01+5:302026-04-11T08:47:23+5:30

अभंगांच्या सुरांनी रंगली भक्तिमय मैफल

crowd in bicholim for abhanga repost message given to preserve saintly tradition and culture | 'अभंग रिपोस्ट'ला डिचोलीत गर्दी; संतपरंपरा व संस्कृती जपण्याचा दिला संदेश

'अभंग रिपोस्ट'ला डिचोलीत गर्दी; संतपरंपरा व संस्कृती जपण्याचा दिला संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : 'अभंग रिपोस्ट' सारखा सुंदर आणि सांस्कृतिक वारसा जपणारा कार्यक्रम डिचोलीसारख्या पवित्र भूमीत होत आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अभंग म्हणजे केवळ गाणी नाहीत, तर ती आपल्या संतपरंपरेची, भक्तीची आणि संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. अभंगातून आपल्याला जीवनमूल्ये, समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश मिळतो. युवा पिढीला ही प्रेरणा आहे, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर अभंग रिपोस्ट कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने राजेंद्र भोबे, आमदार प्रेमेंद्र शेट व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. 

राजेंद्र भोबे यांनी संस्कार संस्कृती टिकवणे गरजेचे असून कलासंगीत भक्तीतून संस्कार देण्याचे काम होत असते. युवा पिढीसाठी ही प्रेरणा असल्याचे सांगितले. यावेळी वारकरी देवानंद नाईक, महादेव तिरोडकर, भाऊ गाड, उदयबुवा फडके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वारकऱ्यांनी दिंडी काढली तसेच मोरूलो समई नृत्य सादर करण्यात आले. या कार्यकमाला प्रचंड गर्दी लोटली. अभंग गायनातून युवा व ज्येष्ठांनी तल्लीन होऊन आनंद लुटला.

Web Title : डिचोली में 'अभंग रीपोस्ट' में उमड़ी भीड़, परंपरा और संस्कृति को बढ़ावा।

Web Summary : डिचोली में 'अभंग रीपोस्ट' का आयोजन हुआ, जिसमें क्षेत्र की संस्कृति और विरासत का उत्सव मनाया गया। विधायक चंद्रकांत शेट्ये ने युवाओं में मूल्यों को स्थापित करने के लिए 'अभंग' के महत्व पर जोर दिया। कार्यक्रम में संगीत, नृत्य और स्थानीय 'वारकरियों' के सम्मान शामिल थे, जिससे बड़ी भीड़ आकर्षित हुई और समुदाय की भक्ति पर प्रकाश डाला गया।

Web Title : 'Abhang Repost' draws crowd in Dicholi, promoting tradition and culture.

Web Summary : Dicholi hosted 'Abhang Repost,' celebrating the region's culture and heritage. MLA Chandrakant Shetye emphasized the importance of 'Abhangs' for instilling values in youth. The event featured music, dance, and honors for local 'warkaris,' drawing a large crowd and highlighting the community's devotion.