तपास नाक्यावर भ्रष्टाचार; पाच कर्र्मचारी बडतर्फ
By Admin | Updated: June 27, 2014 01:35 IST2014-06-27T01:31:38+5:302014-06-27T01:35:59+5:30
पणजी : सार्र्वजनिक बांधकाम खात्याच्या चोर्र्ला घाट-केरी येथील तपास नाक्यावर झालेल्या भ्रष्टाचाराची बांधकाम खात्याने गंभीरपणे दखल घेतली आणि गुरुवारी पाच कर्र्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फ केले.

तपास नाक्यावर भ्रष्टाचार; पाच कर्र्मचारी बडतर्फ
पणजी : सार्र्वजनिक बांधकाम खात्याच्या चोर्र्ला घाट-केरी येथील तपास नाक्यावर झालेल्या भ्रष्टाचाराची बांधकाम खात्याने गंभीरपणे दखल घेतली आणि गुरुवारी पाच कर्र्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फ केले. यापूर्वी अशा प्रकारची कारवाई करून भ्रष्टाचार प्रकरणीच मोले तपास नाक्यावरील आठ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले होते.
परप्रांतांमधील वाहनांकडून गोव्याच्या सीमेवर प्रवेश कर तथा साधनसुविधा कर आकारण्याची योजना सरकारच्या सार्र्वजनिक बांधकाम खात्याने दोन वर्षांपूर्वी मार्गी लावली. यामुळे वार्षिक सुमारे चाळीस कोटींचा महसूल शासकीय तिजोरीत जमा होत आहे. साधनसुविधा कर आकारण्यासाठी सर्व सीमांवर बांधकाम खात्याकडून तपास नाके उभे करण्यात आले. साधनसुविधा कर नाकारण्यास गोव्याच्या जवळील जिल्ह्यांनी विरोध केला होता. त्या जिल्ह्यांमधील भागांना प्रारंभी अशा करातून वगळण्यात आले. मात्र, इतरांकडून कर आकारला जात आहे. तथापि, तपास नाक्यांवर वाहनांना पावती न देताच साधनसुविधा करापोटी पैसे आकारले जातात, अशा तक्रारी येत आहेत.
तपास नाक्यावरील निरीक्षक अमित गावस, महेश पेडणेकर तसेच सुरक्षा रक्षक संदेश आर. गावस, संदेश एस. गावस आणि उदय बी. गावस यांना सेवेतून बडतर्फ केल्याचे मंत्री ढवळीकर यांनी गुरुवारी
जाहीर केले. (खास प्रतिनिधी)