शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Coronavirus: कोविडच्या संकटातही गोव्यात इफ्फीचे आयोजन होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 18:14 IST

एरव्ही जुलै महिन्यात इफ्फीसाठी हॉटेल बुकिंग व अन्य प्रक्रिया सुरू होते पण यंदा ही प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे अजून दिसत नाहीत.

सदगुरू पाटील

पणजी : उर्वरित भारताप्रमाणोच गोव्यातही कोविडचे संकट अजून कायम आहे. गोव्यात तर जून महिन्यात पाचशे नवे रुग्ण आढळले. कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाहीत व त्यामुळे कोविडच्या संकट काळातही भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोव्यात होणार काय अशी प्रश्नार्थक चर्चा राज्यात सुरू झाली आहे.

गेल्या 2004 सालापासून गोव्यात दरवर्षी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो व त्यात सिने कलावंतांसह देश- विदेशातील आठ- दहा हजार प्रतिनिधी सहभागी होतात. वार्षिक सरासरी तेरा कोटी रुपये इफ्फीसाठी खर्च केले जातात. येथील हॉटेल्स, स्थानिक कलाकार, टॅक्सी व्यवसायिक, रेस्टॉरंट्स यांना इफ्फीपासून लाभ होतो. मांडवी नदीतील कॅसिनो व्यवसायिकांनाही लाभ मिळतोच. शिवाय पर्यटन व्यवसाय क्षेत्रलाही इफ्फी लाभदायी ठरतो.

एरव्ही जुलै महिन्यात इफ्फीसाठी हॉटेल बुकिंग व अन्य प्रक्रिया सुरू होते पण यंदा ही प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे अजून दिसत नाहीत. जून महिन्यात जी पूर्वतयारी सुरू व्हायची चाहूल लागते, ती चाहून अजुनही लागत नाही. कोविड संकटामुळे आयनॉक्स मल्टीप्लेक्स यापूर्वीच बंद झाला. तिथे सध्या कुणी फिरकतही नाही. पूर्ण नवा मल्टीप्लेक्स आयनॉक्स स्वखर्चाने बांधणार आहे. त्यासाठी प्राथमिक काम नुकते कुठे सुरू झाले आहे. गेल्यावर्षी पन्नासावा इफ्फी पणजीत पार पडला.  दि. 20 नोव्हेंबरपासून एरव्ही इफ्फीला आरंभ होत असतो. केवळ पाच महिन्यांचा कालावधी आता बाकी आहे. मार्चमध्ये सध्याची आयनॉक्स इमारत पाडली जाईल असे अगोदर जाहीर झाले होते पण अजून इमारत पाडली गेलेली नाही.

गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांना विचारले असता, ते म्हणाले की इफ्फीसाठी साधनसुविधा उभ्या करून देण्याचे काम मनोरंजन संस्था करते. आम्ही कधीही इफ्फीसाठी सज्ज राहू. आम्हाला त्याबाबत काही समस्या नाही. इफ्फीचे आयोजन कधी करायचे किंवा त्याविषयी कोणता निर्णय घ्यावा ते ठरविण्याचा अधिकार हा चित्रपट महोत्सव संचालनालयाचा (डीएफएफ) आहे. आयनॉक्स मल्टीप्लेक्स निश्चितच नोव्हेंबर्पयत उभा राहिल. भारतात तीनच ठिकाणी पहायला मिळतात अशा प्रकारचा अत्याधुनिक मल्टीप्लेक्स उभा राहिल व त्यासाठी गोवा सरकारला एकाही पैशाचा खर्च येणार नाही. उलट पूर्वीपेक्षा यापुढे खूप जास्त महसुल सरकारला मल्टीप्लेक्सद्वारे मिळेल. अगोदर दर महिन्याला आयनॉक्सकडून सरकारला वीस लाखांचा महसुल मिळायचा, यापुढे 54 लाखांचा मिळेल. चार स्क्रिन्स असतील. रेन वॉटर हाव्रेस्टींगची सुविधा व मलनिस्सारण प्रकल्पही असेल. आम्ही सगळ्य़ा सुविधा इफ्फीसाठी वेळेत तयार ठेवणार आहोत.

टॅग्स :IFFIइफ्फीgoaगोवा