Coronavirus : ... तर गोवा जिंकलेली लढाई हरण्याचा धोका 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 01:55 PM2020-04-13T13:55:57+5:302020-04-13T14:09:00+5:30

Coronavirus : अत्यावश्यक सेवाच्या नावाखाली गोव्याबाहेरून येणारे वाहतूकदारांचे व्यवहार हे अस्वस्थ करणारे असे आढळून आले आहेत. 

coronavirus updates in goa transportation by truck was dangerous SSS | Coronavirus : ... तर गोवा जिंकलेली लढाई हरण्याचा धोका 

Coronavirus : ... तर गोवा जिंकलेली लढाई हरण्याचा धोका 

Next

- वासुदेव पागी

पणजी - कोरोना व्हायरसचा संसर्ग गोव्यात अद्याप पहिल्याच टप्प्यावर आढळून आल्यामुळे गोवा धोक्याच्या सावटातून मूक्त झाले असे म्हणणे अतातायीपणा ठरण्यासारखा आहे. कारण अत्यावश्यक सेवाच्या नावाखाली गोव्याबाहेरून येणारे वाहतूकदारांचे व्यवहार हे अस्वस्थ करणारे असे आढळून आले आहेत. 

गोव्याच्या दक्षिण सीमेवरून म्हणजे पोळे चेक नाक्यावरून गोव्यात भाजीसह इतर अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांचे व्यवहार दैनिक लोकमतमधून अभ्यास केले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. कलिंगडे व केळी वाहून आणणारे अनेक ट्रक असतात. केळी व कलिंगडे अत्यावश्यक सेवा कशा काय ठरतात हा वेगळा विषय, परंतु अशा प्रकारच्या वाहतूक करणाऱ्यांत अधिक चिंतेचे वाटणारे तीन प्रकार असे आहेत. 

प्रकार पहिला

कर्नाटकचा नोंदणी क्रमांक असलेला एक भाजीवाहू ट्रक चेक नाक्यावर येऊन उभा राहतो. त्याच्याजवळ कर्नाटक जिल्हा प्रशासनाने दिलेला प्रवेश दाखला दाखवून तो गोव्यात प्रवेश मिळवितो.

लोकमतच्या प्रतिनिधीकडून ट्रक चालकाशी संवाद साधला तेव्हा धक्कादायक महिती मिळाली. हा ट्रक म्हणजे एक कंटेनर आहे. तो दक्षिण गोव्यात एका ठिकाणी हा ट्रक खाली केल्यानंतर न  ट्रक बाळ्ळी येथील कोकण रेल्ट्रवेच्या ट्रक टर्मिनसमध्ये  ठेवला जाणार आहे, आणि त्यानंतर  चालक वास्को येथे घरी जाणार असे म्हणतो. वास्कोला त्याचे घर आहे की आणखी कुठे राहणार याची माहिती नाही.  हा माणूस मंगळूर व इतर काही ठिकाणी जाऊन आला होता. वाटेत चार ठिकाणी थांबून उतरलाही होता. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या शक्यता नाकारता येणार नाहीत. ना क्वारन्टाईन ना आयसोलेशन आणि ना कसली तपासणी. हा माणूस वास्को येथे आपल्या घरी जाऊ तीन दिवस आराम करणार व नंतर पुन्हा ड्युटीवर जाणार. कुणालाही कोणतीही माहिती नाही, संसर्गित ठरला तर किती वेगाने ते पसरणार याची कल्पनाही न करविणारी.

प्रकार दोन

कर्नाटक राज्याचाच नोंदणी क्रमांक असलेली टेम्पो गुड्स कँरिअर गाडी.  मासे आणण्यासाठी ती दक्षिण गोव्यातील एका जेटीवर जायला निघाली आहे. मच्छीमारी बंदीच्या काळात मासळी वाहतूक कशी काय सुरू होते हा वेगळा विषय परंतु त्याने पुढे सांगितलेला प्रकार अधिक भयानक.  तेथे मासळी मिळाली तर ती भरून घेऊन त्वरित परतणार. नाही तर मासळी मिळेपर्यंत थांबणार. म्हणजे परराज्यातून आलेला हा माणूस थांबला तर कुठे थांबणार, कोणत्या परिस्थितीत थांबणार किती दिवस थांबणार याची माहिती मिळविण्याची यंत्रणा नाहीत. शिवाय नियमानुसार त्याच्यावर चेक नाक्यावर होम क्वॉर्टाईनचा शिक्काही मारता येत नाहीत. 

प्रकार तीन

गोव्यात अत्यावश्यक सेवेखाली येणारे ट्रक त्या दिवशी माल उतरवून पुन्हा परत जाणे अपेक्षित असते. असे ट्रक दोन ते तीन दिवसांनी परत जात असल्याचेही अनेक प्रकार आढळून आले आहेत, तशा नोंदी सरकारी यंत्रणांच्या नोंदवहीत आढळत आहेत. एका पोळे चेक नाक्यावरूनच नव्हे तर मोले चेक नाक्यावरही हीच कहाणी असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.  त्यामुळे ट्रकमधील माल रिकामा करून हे लोक एक ते चार दिवसापर्यंत गोव्यातच राहतात. ते कुठे राहतात, कसे राहतात याची कोणत्याही प्रकारची माहिती मिळविण्याची यंत्रणा नाही हे खूप धोकादायक ठरू शकते, कारण हे ड्रायव्हर व इतर कर्मचारी केवळ वाहनाला गोव्यात प्रवेश मिळविण्याचा दाखला घेऊन आलेले असतात, त्यांच्या आरोग्याचा किंवा चाचणी अहवालाचा दाखला घेऊन आलेले नसतात. 

कामगारांच्या सुरक्षेचे काय?

कोविड 19  हा विषाणू कामगार वर्गाने भारतात व सर्व जगात पसरविलेला नाही तर विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांनी पसरविलेला आहे. कामगार वर्ग हा त्याचे बळी आहेत. आज सर्व काही लॉकडाऊन झालेले असता वैद्यकीय व पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच लॉरी चालक, क्लीनर, पेट्रोलपंपवरील कर्मचारी वैगेरे जीवाची बाजी लावून अर्थव्यवस्था राखण्याचे काम करीत आहेत त्यांच्या सुरक्षेचे काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. एखादा ट्रकचालक एका जागेहून बाहेर पडून नियोजित ठिकाणी माल पोहोचवून  आपल्या घरी येईपर्यंत त्यांची काळजी घेणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. हा कामगार कोविड-19 चा वाहक नसतो, परंतु तो संसर्गीत झाला तर त्याच्या कुटुंबासह समाजही धोक्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बापरे! ...म्हणून त्याने मित्राला सुटकेसमध्ये भरून घरी आणलं, पण...

Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत

Coronavirus : चौथ्या दिवशीही सर्व रिपोर्ट निगेटिव्ह, 'या' राज्यात 4 दिवसांत एकही रुग्ण नाही कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर

 

Web Title: coronavirus updates in goa transportation by truck was dangerous SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.