'खर्च कपातीसाठी मंत्रिमंडळाचा आकार कमी करा, तीनच मंत्री पुरे'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 08:33 PM2020-04-10T20:33:52+5:302020-04-10T20:41:54+5:30

मुख्यमंत्री कोरोनाविरोधी मदत कार्यासाठी देणग्याही मागत आहेत. त्यांनी प्रथम मंत्रिमंडळाचा आकार कमी करावा व फक्त तीनच मंत्री ठेवावेत, अशी मागणी मगोपचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.

coronavirus Reduce cabinet size says sudin dhavalikar in goa SSS | 'खर्च कपातीसाठी मंत्रिमंडळाचा आकार कमी करा, तीनच मंत्री पुरे'

'खर्च कपातीसाठी मंत्रिमंडळाचा आकार कमी करा, तीनच मंत्री पुरे'

Next

पणजी - मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरकार आर्थिक अडचणीतून जात असल्याचे प्रथमच मान्य केले आहे. ते खर्च कपातीची भाषा बोलतात व लोकांकडून सध्या कोरोनाविरोधी मदत कार्यासाठी देणग्याही मागत आहेत. त्यांनी प्रथम मंत्रिमंडळाचा आकार कमी करावा व फक्त तीनच मंत्री ठेवावेत, अशी मागणी मगोपचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.

राज्यातील काही आमदारांना सरकारी सुरक्षा आहे. तीही मागे घेतली जावी व अनेक आमदारांकडे सरकारी महामंडळे आहेत. त्यांच्याकडून महामंडळे काढून घेऊन सचिव स्तरावरील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडे तो ताबा सोपवावा. कारण या सगळ्यावर राजकारणी सरकारचा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहे. जर मुख्यमंत्र्यांनी खर्च कपातीसाठीचे मोठे पाऊल म्हणून या सगळ्य़ा गोष्टी केल्या व केवळ तीनच मंत्री सरकारमध्ये ठेवले तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील व मगच लोक निधी देतील, असेही ढवळीकर येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी, त्यांच्यासाठी स्वतंत्र गाड्या, वेतन यावर बराच खर्च होतो, असे ढवळीकर म्हणाले.

आता कोरोनामुळे जी स्थिती आली आहे, तशीच स्थिती गोवा मुक्तीनंतर पहिली काही वर्षे गोव्यात होती. भाऊसाहेब बांदोडकरांना शून्यातून विश्व निर्माण केल्याप्रमाणो गोव्यात सगळे अस्तित्वात आणावे लागत होते व त्यावेळी ते फक्त तीनच मंत्री घेऊन काम करत होते. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे नव्या विकास कामांसाठी पैसा नाही. नवी कामे होऊ शकणार नाहीत. सरकारने काढलेल्या निविदा रद्द कराव्यात. राष्ट्रीय महामार्ग,पुल व अन्य पायाभूत साधनसुविधांची जी एक हजार कोटींची कामे सुरू आहेत, तीच तेवढी सरकारने सुरू ठेवावी. पंचायत, कला संस्कृती व अन्य काही खात्यांच्या मंत्र्याना आता काहीच काम असणार नाही, त्यामुळे मंत्र्यांची संख्या कमी करावी अशे ढवळीकर म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तानावडे हे ईडीसीचे चेअरमन आहेत. अन्य दोघे पदाधिकारी सरकारच्या दोन आयोगांची आयुक्तपदे घेऊन बसले आहेत, त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी बाजूला काढून सरकारी खर्च टाळावा व विश्वासाचे वातावरण अगोदर तयार करावे, असे ढवळीकर म्हणाले.

सात हजार कुटूंबांना धान्य 

आपण सरकारला तूर्त माझ्याकडील वेतन देणार नाही, कारण मंत्री, आमदार जर मोठ्या प्रमाणात सरकारी पैसा स्वत:साठी खर्च करणार असतील तर लोक कोरोना कामासाठी पैसे कसे काय देतील? मी मला मिळणारे वेतन मडकई मतदारसंघात लोकांसाठीच खर्च करीन. संकटकाळात नुकतेच सात हजार कुटूंबांर्पयत मी मोफत धान्य वाटले. त्याशिवाय झोपडपट्टीतील बाराशे कुटूंबांना धान्य वाटले, असे ढवळीकर यांनी सांगितले.
 

Web Title: coronavirus Reduce cabinet size says sudin dhavalikar in goa SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.