शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

CoronaVirus : गोव्यात धान्य पुरवठ्याचे राजकीयीकरण, गरीब भुकेलेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 2:53 PM

CoronaVirus : पूर्ण देशात अन्न धान्याची दुकाने सुरु होती, तेव्हा सरकारने अगोदर गोव्यातील सगळी दुकाने बंद केली.

पणजी : गोव्यात अन्नधान्य पुरवठ्याची सुत्रे अनेक आमदारांनी स्वत:च्या हाती घेतली आहेत. परिणामी धान्य पुरवठा व्यवस्थेचे पूर्ण राजकीयीकरण झाले आहे. जे आपले मतदार आहेत, त्यांनाच धान्य पुरविण्याचा मार्ग राजकारण्यांनी स्वीकारला आहे. राजकारण्यांशी कनेक्ट नसलेल्या गरीबांना यामुळे भूक सहन करावी लागत आहे.

पूर्ण देशात अन्न धान्याची दुकाने सुरु होती, तेव्हा सरकारने अगोदर गोव्यातील सगळी दुकाने बंद केली. लोकांच्या टीकेनंतर सरकारने दुकाने उघडी केली पण 30 आमदारांची बैठक घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धान्य पुरवठा काम आमदार, सरपच, आमदारांचे कार्यकर्ते यांच्याकडे सोपवले. अनेक आमदारांनी लगेच मोठ्या दुकानदारांना हाताशी धरुन मालाचा स्वत: ताबा घेतला. राजकारण्यांनी माल साठवणे सुरु केले. 

काही आमदारांनी स्वत: बेळगाव कोल्हापूर आदी भागांतून  अन्नधान्याचे ट्रक भरुन आणले. काहीजणांनी भाजीचे ट्रक आणले. या व्यवस्थेत सरकारी अधिकारी व कर्मचारी कुठेच दिसत नाहीत. अनेक भागांमध्ये आमदारांनी आपल्या समर्थकांमध्ये मालाचे वितरण केले आहे. तिसवाडी तालुक्यातही हेच चित्र दिसत आहे. काही आमदारांनी माल साठवून ठेवला आहे. यापुढे गोव्यात धान्याची जेव्हा जास्त टंचाई होईल तेव्हा आम्ही आमच्या समर्थकांना धान्य वाटू अशी रणनीती भाजपच्या काही आमदारांनी ठरवून टाकली असल्याची माहिती कार्यकर्त्यांमधील चर्चेवरून मिळत आहे. 

उत्पलचे मदत कार्य राजधानी पणजीत सुद्धा जी काही गरीब कुटुंबे राजकारण्यांशी कनेक्टेड नाही त्यांचे हाल होत असल्याचे पाहून स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल नाराज झाले. त्यांनी गोव्याच्या काही भागांतून धान्य मिळविले व महालक्ष्मी ट्रस्टतर्फे त्यांनी ते देऊळवाडा वगैरे भागात फुकट वाटले. आपल्याला धान्य मिळविण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागले असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या