शहरं
Join us  
Trending Stories
1
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
2
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
3
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
4
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
5
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
6
मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
7
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
8
‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  
9
"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
10
अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार?
11
महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
12
"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
13
Sangli: मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का! उमेदवार आझम काझींसह ८ जण कोल्हापूर-सांगलीतून हद्दपार
14
मुस्लिम मतांची गरज नाही, त्यांच्या घरीही जात नाही; भाजपा आमदाराच्या विधानानं वाद, Video व्हायरल
15
चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती
16
"अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला", हर्षवर्धन सपकाळ यांची टीका   
17
मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."
18
Makar Sankrant 2026: यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग; खिचडी नाही, तर करा 'या' वस्तूंचे दान
19
बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या
20
एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : गोव्यात कोविडचा ज्येष्ठांना विळखा! ६0 पेक्षा अधिक वयाच्या मृतांचे प्रमाण तब्बल ६१ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 22:00 IST

दोनापावल येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीस्टेडियमवरील  कोविड निगा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी खास वॉर्ड उघडण्यात आला आहे.

पणजी : गोव्यात कोविड पॉझिटिव्हने मृत्यू होण्याचे प्रमाण ६0 पेक्षा अधिक वयोगटात जास्त आहे. आतापर्यंत बळी गेलेल्यांच्या आकडेवारीत असे स्पष्ट झाले आहे की, राज्यात मृतांमध्ये ६0 पेक्षा अधिक वय असलेल्यांचे प्रमाण ६१ टक्के आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अधिक दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरले आहे.

दोनापावल येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीस्टेडियमवरील  कोविड निगा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी खास वॉर्ड उघडण्यात आला आहे. २४ तास डॉक्टर, हाऊसकिपिंगची सोय येथे करण्यात आलेली आहे, असे आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. शनिवारी खोर्ली, म्हापसा येथील ७४ वर्षीय वृद्धाचे निधन झाले. याच दिवशी करासवाडा म्हापसा येथील ४0 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

शुक्रवारी ७ रोजी तिघांचे कोविडने निधन झाले. हे तिघेही ६0 पेक्षा जास्त वयाचे होते. वास्को येथील ७८ वर्षीय वृद्धाचे मडगावच्या ईएसआय इस्पितळात निधन झाले. म्हापसा येथील ६२ वर्षीय तसेच सडा, वास्को येथील ८0 वर्षीय वृद्धाचा याच दिवशी मृत्यू झाला. कुडणे, डिचोली येथील ३0 वर्षीय युवकाचा शुक्रवारी बळी गेला.

आजच्या घडीला एकूण २३३२ सक्रीय कोविड पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात आहेत. तर ५८0२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. खात्याच्या बुलेटिनमध्ये मृतांची आकडेवारी तपासली असता ४0 आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मृतांचे प्रमाण ३४  टक्के, ४0 पेक्षा कमी वय असलेल्या मृतांचे प्रमाण ५ टक्के एवढे असल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत ६0 पेक्षा अधिक वयाचे ४४ जण कोविडने दगावले. ४0 पेक्षा अधिक वयाचे २३ तर ४0 पेक्षा कमी वयाचे ५ जण दगावले.

सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे १४ वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी कोविडची बळी ठरली. आल्तिनो येथे २९ वर्षे वयाच्या आणि कुडणे, डिचोली येथील ३0 वर्षे वयाच्या युवकाचे निधन झाले. कुडणे येथील युवकाचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. या युवकाची संसाराची स्वप्ने धुळीस मिळाली.

असा आहे मृतांचा आकडा ६0 पेक्षा अधिक वय : ४४४0 पेक्षा अधिक वय : २३४0 पेक्षा कमी वय  :  0५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा