गोव्यात ७ जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू, सरकारची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 16:41 IST2021-05-29T16:41:15+5:302021-05-29T16:41:33+5:30
कर्फ्यू वाढविला जाईल, असे वृत्त लोकमतने दिले होतेच. ते खरे ठरले आहे. कोविड रुग्ण संख्या सध्या घटू लागली आहे.

गोव्यात ७ जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू, सरकारची घोषणा
पणजी : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्फ्यू येत्या ७ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी याविषयीचा तपशीलवार आदेश जारी करतील, असे सरकारने शनिवारी दुपारी येथे जाहीर केले. (CoronaVirus Government extends curfew till June 7 in Goa)
कर्फ्यू वाढविला जाईल, असे वृत्त लोकमतने दिले होतेच. ते खरे ठरले आहे. कोविड रुग्ण संख्या सध्या घटू लागली आहे. ती आणखी कमी व्हावी या हेतूने सरकारने कर्फ्यू सध्या सात दिवसांसाठी वाढवला आहे. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. त्यामुळे लोकांनी चिंता करण्याचे कारण नाही.
कर्फ्यूची मुदत उद्या ३० रोजी संपत होती पण तत्पूर्वीच सरकारने निर्णय घेतला. कर्फ्यूच्या उर्वरित अटी ह्या पूर्वीप्रमाणेच राहतील अशी माहिती मिळाली. केसिनो, मद्यालये, रेस्टॉरंट, मासळी बाजार हे सगळे बंद राहील.