शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

CoronaVirus News: गोव्यात 292 कोरोना रुग्ण; सत्तरीसह वास्कोलाही लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 21:25 IST

नवे वाडे तसेच वास्कोत कोरोना रुग्ण आढळले आहेत, त्यांचा मांगोरहीलशी संबंध आला होता.

पणजी : राज्यात कोरोनाचे एकूण 29 नवे रुग्ण मंगळवारी आढळले. सत्तरी तालुक्यासह वास्कोलाही कोरोनाची लागण झाली आहे. एकूण 19 आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 292 झाली आहे. हे सगळे इस्पितळात आहेत.नवे वाडे तसेच वास्कोत कोरोना रुग्ण आढळले आहेत, त्यांचा मांगोरहीलशी संबंध आला होता. सत्तरी तालुक्यातील मोर्ले गावात तसेच मळपण तसेच गुळेली व उसगावमध्ये कोरोना पॉङिाटीव रुग्ण आढळले. हे सगळेजण आरोग्य कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांचा मांगोरहीलशी संबंध आला होता.आरोग्य खात्याच्या सचिव निला मोहनन यांची सायंकाळी येथे पत्रकार परिषद झाली. मांगोरहीलला मोहनन यांनी मुख्य सचिवांसोबत मंगळवाही भेटही दिली. मांगोरहीलचा भाग हा अजून आमच्यासाठी खूप चिंताजनक आहे. कोरोना रुग्णांचा ग्राफ तिथे उतरतोय असे आम्ही म्हणत नाही पण संख्या हळूहळू कमी होतेय. जे 29 रुग्ण मंगळवारी आढळले, त्यापैकी बावीसजण हे मांगोरहीलशीसंबंधित आहेत.विविध गावांतील आरोग्य कर्मचारी जरी कोरोनाग्रस्त आढळले तरी, राज्यात कोविडचा सामाजिक संगर्स सुरू आहे असे म्हणता येणार नाही असे निला मोहनन यांनी सांगितले. मांगोरहीमधील लोकांशी आम्ही मंगळवारी बोललो. तिथे लोकांना ओपीडीची वेळ वाढवून हवी होती. त्यामुळे आज बुधवारपासून सकाळी दहा ते दुपारी एक असे तीन तास ओपीडी चालेल, असे त्यांनी स्पष्ट केले.तो डॉक्टर पॉझिटिव्ह जे 29 नवे रुग्ण मंगळवारी आढळले, त्यापैकी सहा आरोग्य कर्मचारी आहेत. सोमवारपर्यंत तेरा आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह  आढळले होते. रस्ता मार्गे मुंबईहून आलेल्या चार व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्या. ओरंगाबाद व दिल्लीहून आलेले दोघे प्रवासी कोविड पॉझिटिव्ह  आढळले. शिरोडा येथील कोविड काळजी केंद्रालाही आपण भेट दिली. तिथे 69 असिम्पटोमेटीक व्यक्तींना ठेवले गेले आहे, त्यांना रुग्ण देखील म्हणता येणार नाही असे मोहनन यांनी स्पष्ट केले. मांगोरहीलचा जो डॉक्टर अगोदर कोविद निगेटीव आढळला होता, तो आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.दुकाने उघडण्यास नकार मांगोरहीलच्या लोकांना रेशन योग्य वेळी मिळत नाही असे नागरिकांनी सांगितले. त्यावर उपाय काढला गेला. मांगोरहीलच्या कंटेनमेन्ट झोनला जो बफर आहे, त्या बफरमधील दुकाने खुली करा अशी मागणी नागरिकांनी केली होती. ती मागणी मान्य करता येत नाही हे नागरिकांना सांगितले गेले, असे मोहनन यांनी स्पष्ट केले. राज्यभरातील कोविड चाचण्यांचे एकूण 1089 अहवाल येणो बाकी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या