Coronavirus: गोव्यात अजूनही पाच हजार विदेशी नागरिक; एकही जागा हॉटस्पॉट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 16:29 IST2020-04-17T16:27:11+5:302020-04-17T16:29:32+5:30

पर्यटन हंगामावेळी गोव्याच्या पर्यटनाचा लाभ घेण्यासाठी हे विदेशी नागरिक आले होते. तथापि, कोरोनामुळे लॉक डाऊन झाल्याने ते इथेच अडकून पडले.अनेक रशियन्सही गोव्यात आहेत.

Coronavirus: Goa there is still no Kovid hotspot; five thousand foreigners trouble in goa vrd | Coronavirus: गोव्यात अजूनही पाच हजार विदेशी नागरिक; एकही जागा हॉटस्पॉट नाही

Coronavirus: गोव्यात अजूनही पाच हजार विदेशी नागरिक; एकही जागा हॉटस्पॉट नाही

पणजी : गोव्यात अजूनही साडेचार ते पाच हजार विदेशी नागरिक आहेत. गोव्याहून 23 खास विमानांद्वारे 4 हजार 239 विदेशी पर्यटक त्यांच्या मायदेशी परतले तरी, अजून पाच हजार विदेशी गोव्यात आहेत, अशी माहिती विदेशातील दूतावासांनी गोवा सरकारच्या यंत्रणोला दिली आहे. मुख्य सचिव परिमल रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची शुक्रवारी बैठक झाली. त्यावेळी ही माहिती समोर आली. पर्यटन हंगामावेळी गोव्याच्या पर्यटनाचा लाभ घेण्यासाठी हे विदेशी नागरिक आले होते. तथापि, कोरोनामुळे लॉक डाऊन झाल्याने ते इथेच अडकून पडले.अनेक रशियन्सही गोव्यात आहेत.

गोव्यात कोरोनाविषयक स्थिती कशी आहे, मदत कार्य कसे सुरू आहे, लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी सुरू आहे व येत्या 20 नंतर कोणत्या सेवा किंवा व्यवसाय गोव्यात सुरू करता येतील याविषयीही बैठकीत चर्चा झाली. गोव्यात कोरोनाचा सामाजिक प्रसार झालेला नाही. आतापर्यंत जे सात रुग्ण आढळले, त्यापैकी सहाजण विदेशातूनच आले होते. सातपैकी सहा रुग्ण उपचारानंतर बरे झाले. आता फक्त एकच कोरोना पॉझिटिव्ह कोविद इस्पितळात उपचार घेत आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रलयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गोव्यात कोविदचा एकही हॉटस्पॉट नाही. दोन्ही जिल्हे नॉन हॉटस्पॉट गटात येतात. त्यामुळेच केंद्रीय गृह मंत्रलयाच्या यादीनुसार गोव्यात येत्या दि. 20 नंतर अतिरिक्त व्यवसायिक उपक्रम सुरू करता येतात असे आरोग्य सचिवांनी बैठकीत सांगितले. गोव्यासाठी एक हजार थर्मल गन्सची खरेदी केली जाणार आहे. राज्याच्या सीमांवर यापुढे जलदगतीने कोविद चाचणी  करण्याचे काम केले जाणार आहे. तीन दिवसांत घरोघर सर्वेक्षण ज्या कर्मचा-यांनी पूर्ण केले त्यांची बैठकीत प्रशंसा करण्यात आली. अबकारी आयुक्तांच्या मते गोव्यात मद्यनिर्मिती उद्योगांनी एकूण 1 लाख 58 हजार लिटर सॅनिटायझरची निर्मिती केली. त्यापैकी 33 हजार 500 लिटर सॅनिटायझर गोवा सरकारला व संरक्षण दलाला पुरविण्यात आले.

Web Title: Coronavirus: Goa there is still no Kovid hotspot; five thousand foreigners trouble in goa vrd

टॅग्स :goaगोवा