शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

Coronavirus : गोवेकरांचा ' गिनी पिग' सारखा प्रयोगासाठी वापर नको; आयुर्वेदिक उपचार पद्धतीला काँग्रेसची हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 4:32 PM

प्रयोगासाठी गोवेकरांचा ' गिनी पिग' सारखा उपयोग करून त्यांचा जीव धोक्यात घालू नका असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.

मडगाव - गोव्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करण्यात आला, तसेच आयुर्वेदिक उपचार पद्धती वापरण्यात आली, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. त्यावर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून प्रयोगासाठी गोवेकरांचा ' गिनी पिग' सारखा उपयोग करून त्यांचा जीव धोक्यात घालू नका असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.यासंबंधी बोलताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी, सदर औषधे व उपचार पद्धतीचा वापर करण्यासाठी नेमकी कोणती औषधे वापरण्यात आली व कोणती उपचार पद्धती वापरण्यात आली त्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यानी देणे गरजेचे आहे. सरकारने गोमंतकीय रुग्णांवर प्रयोग करू नयेत व त्यांचे जीवन धोक्यात घालू नये असे म्हटले.गोवा सरकारने जो दावा केला आहे त्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांवर सदर औषधांचा वापर करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय व आयईसीकडून परवानगी घेतली होती का हे सरकारने स्पष्ट करावे. आयुष मंत्रालयाने कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक औषधे व उपचार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता घेतली आहे का हे उघड करावे असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे.सरकारने कोरोना विषाणू संबंधी सर्व निर्णय तज्ज्ञांना विचारूनच व त्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावेत या माझ्या मागणीचा मी पुनरुच्चार करतो. आपण सध्या कठीण व नाजूक अशा काळातून जात असून, खूप विचारपूर्वक सर्व निर्णय घेणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, काल सामाजिक चाचणी घेण्यासाठी नेमलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्राच्यावेळी सामाजीक अंतराचे संकेत पायदळी तुडविण्यात आले. आज विविध वर्तमानपत्रातील बातम्या बघून लोकांनी या चाचणीचा धसकाच घेतला आहे. सरकारने सुरक्षाकवच न देताच कर्मचाऱ्यांना चाचणीस पाठवल्यास गोव्यात कोरोनाचा टाईम बॉम्ब फुटण्यास वेळ लागणार नाही हे ध्यानात ठेवावे. मुख्यमंत्र्यांनी सामाजिक चाचणीचा विचार बदलून सामाजिक स्क्रीनिंग व चाचणी करण्याचा निर्णय घेणेच योग्य ठरेल याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या