शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

CoronaVirus : गोव्यात चिंता वाढली, कोरोनाचा सहावा रुग्ण आढळला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 8:23 AM

coronavirus : कोरोनाचा रुग्ण ठरलेला हा इसम गेल्या 19  मार्चला गोव्यात आला होता.

पणजी : गोव्यात कोरोनाचा सहावा पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. आफ्रिकेहून आलेल्या गोमंतकीय व्यक्तीची गोमेकाॅ इस्पितळात वैद्यकीय चाचणी केली असता त्याचा अहवाल कोविड-19 पाॅझिटिव्ह आला आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी ही माहिती शुक्रवारी दिली.

कोरोनाचा रुग्ण ठरलेला हा इसम गेल्या 19  मार्चला गोव्यात आला होता. त्याला थंडी ताप होता व गोमेकाॅ इस्पितळात त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल आता आला. त्याचे कुटुंबीय व इतर ज्या व्यक्ती त्याच्या संपर्कात आल्या त्यांना शोधून काढून वैद्यकीय निगराणीखाली ठेवले जाणार आहे. 

दुसर्‍या एका घटनेत  गोमेकाॅतील कोविड 19 वाॅर्डमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण हा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही. त्याची कोविड-19 चाचणी निगेटिव्ह आली होती. त्याला श्वासोच्छ्वासाचा त्रास होता. दरम्यान,  बांबोळीच्या गोमेकाॅ इस्पितळात जे पाच पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांच्यापैकी दोघांची वैद्यकीय चाचणी गोमेकाॅच्या प्रयोगशाळेत गुरुवारी केली. त्यावेळी दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. म्हणजेच,  हे दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तथापि कोणताच संशय राहू नये म्हणून पुन्हा आज शुक्रवारी या रुग्णांची नव्याने कोरोना चाचणी करून पाहिली जाईल,  असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या