शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

'कर्णिका जहाजावर अडकलेल्या 93 गोवेकरांना गोव्यात आणा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 7:00 PM

अडकलेल्या खलाशांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : खास बसेस पाठविण्याची मागणी

मडगाव: मुंबई बंदरावर अडकलेल्या कर्णिका या जहाजावर असलेल्या 93 गोवेकर खलाशाना गोव्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करणारे सह्यांचे निवेदन  मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना पाठविले आहे.

दरम्यान , कोची बंदरात असलेले मारावेला हे जहाजही मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून या जहाजावर 65 गोवेकर अडकले आहेत, हे जहाज गोव्यातून मुंबईला जाणार असल्याने ते गोव्यातच थांबवून गोवेकारांना गोव्यातच उतरविता येणे शक्य आहे का याचा सरकारने विचार करावा अशी मागणी  गोवा सीमेन अससोसिएशनने केली आहे.

सध्या मुंबईत असलेल्या  कर्णिका या जहाजावर एकूण 490 खलाशी असून त्यापैकी 93 गोवेकर आहेत. 1 मार्च रोजी 124 प्रवाशांना घेऊन हे जहाज दुबईला जाण्यासाठी मुंबईहून बाहेर पडले होते. 5 रोजी ते दुबईला पोहोचले त्यानंतर कुठल्याही प्रवाशांना न घेता ते परत मुंबईत 12 मार्च रोजी परतले. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खलाशाना 14 दिवस क्वारान्टीन करून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा विलगीकरणाचा कालावधी 26 मार्चला संपणार होता पण 24 तारखेपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने सगळे खलाशी आतच  अडकले.

या खलाशानी मुख्यमंत्री सावंत यांना लिहिलेल्या पत्रात या जहाजावर असलेल्या मुंबईतील खलाशाना घरी जाऊ दिले. ब्रिटिश व अमेरिकन खलाशाना त्या त्या देशातील अधिकारी घेऊन गेले. आत अडकलेल्या गोव्याच्या खलाशाना बाहेर काढण्यासाठी  सरकारने खास बसी पाठवाव्या अशी मागणी केली आहे .

दरम्यान दुबईच्या किनाऱ्यावरही दोन जहाजे अडकून पडली असून त्यातही गोवेकर खलाशी अडकले आहेत. मागचा महिनाभर आम्ही तणावाखाली वावरत असल्याची माहिती नोटीकन ओशियानिया या बोटीवर अडकलेला केपेतील खलाशी विजय देवर यांने सांगितले. या बोटीवरही 43 गोवेकर अडकले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या