शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

CoronaVirus News: सर्वसामान्य रुग्ण म्हणून रुग्णालयात आणलेल्या 5 रुग्णांचं मडगावात कोविडमुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:40 IST

दोन दिवसातील घटनांनी डॉक्टरही भयभीत; काही नातेवाईकांचं असहकार्य

मडगाव: सर्वसामान्य रुग्ण म्हणून जिल्हा इस्पितळात आणलेल्या रुग्णांचे निधन झाल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून येण्याच्या तब्बल 5 घटना मागच्या 2 दिवसात मडगावात घडल्या असून त्यामुळे डॉक्टरांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रुग्णांचे नातेवाईकही तो मृतदेह स्वीकारण्यास घाबरत असल्याने इस्पितळ प्रशासन वेगळ्याच अडचणीत सापडत आहे.

सध्या ज्या फातोर्डा येथील 51 वर्षीय रुग्णांच्या मृत्यूमुळे हॉस्पिसिओ इस्पितळ चर्चेत आले आहे त्याच्या बाबतही असेच झाले होते. सदर रुग्णाला कॅन्सरची व्याधी होती. त्याला  गोमेकॉत हलविताना वाटेत त्याचे निधन झाले. त्याचा मृतदेह परत हॉस्पिसिओत आणून स्वेब चाचणी घेतली असता पहाटे तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर त्याच्या बरोबर असलेल्या तीन व्यक्ती घाबरून त्याचा 30 वर्षीय मुलाला इस्पितळात एकटेच टाकून निघून गेल्या. व त्यानंतरच पुढचे नाट्य घडले.

हॉस्पिसिओच्या डॉक्टरानी केलेल्या खुलाशाप्रमाणे, आपले मृत वडील कोरोनाबाधित असल्याचे कळून आल्यावर व बरोबरचे इतर लोक नाहीसे झाल्याने तो मुलगा अगदी बांभाहुन गेला होता. अशा अवस्थेत असलेल्या त्या मुलाला मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी मोती डोंगरावरील शवागारापर्यंत जाण्यास सांगितले होते. मात्र त्या बांभावलेल्या अवस्थेत त्याला कदाचित मृतदेह घरी घेऊन जा असे म्हटले असावे असे वाटले असेल, त्यातूनच त्याचा गैरसमज होण्याची शक्यता या डॉक्टरने व्यक्त केली. शवागारात मृतदेह नेमका कुठल्या कक्षात ठेवला आहे याची कुटुंबियांना माहिती असावी यासाठीच मृताच्या नातेवाईकानी शवागारापर्यंत जावे असे त्यांना सांगण्यात येते.

मागच्या 2 दिवसातच सर्वसामान्य रुग्ण  म्हणून इस्पितळात उपचारासाठी आणलेल्या 5 व्यक्ती कोविडबाधित होत्या हे त्यांच्या निधनानंतर आढळून आल्या असल्याची माहिती हॉस्पिटलच्या सूत्रांकडून मिळाली आहे. यातील पहिली घटना 23 तारखेची असून कुडतरी येथील एक 64 वर्षीय व्यक्ती त्याच्या घराशेजारील फूटपाथवर मृतावस्थेत आढळून आल्यावर त्याला इस्पितळात आणले असता तो कोविडबाधित असल्याचे स्पष्ट झाले. हा इसम मडगावात गांधी मार्केटात कामाला असल्याचा. मागच्या आठवड्यात त्याला ताप आला होता नंतर तो बराही झाला होता. शनिवारी रात्री तो आपल्या कुडतरी येथे घरी जात असता वाटेतच त्याचे निधन झाले होते. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट उजेडात आली.

दुसरी घटना मोती डोंगरावरील असून 24 रोजी एका 50 वर्षीय इसमाला पोटात आणि छातीत दुखत असल्यामुळे तपासणीसाठी इस्पितळात आणले जात असताना वाटेत त्याचे निधन झाले. मृतदेहाच्या स्वेब चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळून आला. पाच दिवसापूर्वी त्याच्या वडीलाचेही कोविडने निधन झाले होते.

तिसरी घटना मूळ मोतीडोंगर येथील पण सध्या केपेत राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेला रात्री घरातच झोपली असताना मृत्यू आला म्हणून हॉस्पिसिओत आणले असता तीही कोविडच्या बाधेने मृत झाल्याचे दिसून आले . लोटली येथील एका व्यक्तीवर हॉस्पिसिओत उपचार चालू असताना निधन झाले मागाहून तो कोविडबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. पाचवे उदाहरण फातोर्डा येथील त्या 51 वर्षीय रुग्णाचे आहे.

हॉस्पिसिओतील एका डॉक्टरने सांगितले, या सर्व रुग्णांना सर्वसामान्य रुग्ण म्हणूनच ज्या डॉक्टरनी हाताळले ते सगळे आता बांभाहून गेले आहेत. एव्हढेच नव्हे काही रुग्णांच्या बाबतीत तर ज्या नातेवाईकानी त्यांना इस्पितळात आणले त्यांचेही वर्तन रुग्ण पॉझिटिव्ह म्हणून केल्यानंतर वेगळ्याच प्रकारचे झाल्याचेही निदर्शनास आल्याचे अनुभव काही डॉक्टरांनी सांगितले.

मृतदेहाद्वारे कोविडचा प्रसार होत नाहीमडगाव इस्पितळाचे शव चिकित्सक डॉ. मधू घोडकीरेकर म्हणाले, कोविड विषाणूचा प्रसार श्वासोच्छ्वासाद्वारे होत असतो. मृत व्यक्तीचा श्वासोच्छ्वास बंद झालेला असल्याने त्याच्याद्वारे प्रसार होण्याची कुठलीही शक्यता नसते. मृत होण्यापूर्वी हात किंवा अन्य अवयवाकडे त्या मृताचा संपर्क येण्याची शक्यता असते ही गोष्ट जरी खरी असली तरी असा मृतदेह प्लॅस्टिक बॅगेत पॅक केला जातो त्यामुळे विषाणू दुसऱ्यांना लागू शकत नाही त्यामुळे कोरोना बाधित मृताचा कुणी धसका घेण्याची गरज नाही असे त्यांनी सांगितले.