शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

गोवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वादाचा भडका; जमावाकडून मंत्र्यावर दगडफेक

By सूरज.नाईकपवार | Updated: February 19, 2024 16:06 IST

रविवारपासून या भागात तणावाचे वातावरण होते. एकंदर स्थिती बघून पोलिसांनी ज्यादा कुमकही बोलावून घेतली होती.

मडगाव: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याच्या मुद्द्यावरून सोमवारी दक्षिण गोव्यातील सासष्टीतील सां जुझे दि अरियाल येथील पाद्रीभाट येथील वातावरण तापलं होतं. संतप्त जमावाने समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांना लक्ष्य बनवत त्यांच्यावरही दगडफेक केली. यात ते किरकोळ जखमीही झाले. फळदेसाई हे या पुतळ्याचे अनावरण करुन माघारी जात असताना हा प्रसंग घडला. यामुळे घटनास्थळी उपस्थित शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी घटनेचे गांर्भीय बघून वेळीच स्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टळला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. दरम्यान, मंत्री फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, सर्वांनी धार्मिक सलोखा सांभाळावा, कुणीही कायदा हातात घेउ नये असे आवाहन केले.

रविवारपासून या भागात तणावाचे वातावरण होते. एकंदर स्थिती बघून पोलिसांनी ज्यादा कुमकही बोलावून घेतली होती. पाद्रीभाट येथील एका खासगी जागेत हा पुतळा बसविण्यात आला आहे. ही जागा मकानदर यांची आहे. ते स्वत: मुस्लिम आहेत. त्यांनी ही जागा अनंत तांडेल यांना दिली आहे. मुख्य रस्त्यापासून ही जागा दूर आहे. टेकडीवजा अशी ही जागा आहे. रविवारी या पुतळ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी त्या खासगी जमिनीत रस्ता तयार करण्याचे काम केले जात असताना, स्थानिकांनी त्याला हरकत घेतली होती. या लोकांनी नंतर हे काम रोखले होते. वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा हेही नंतर घटनास्थळी आले होते. पुतळा बसविण्यास आक्षेप नाही मात्र डोंगर कापणी व बेकायदा मातीचा थराव टाकण्याला आपला आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले होते. नंतर घटनास्थळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला गेला होता.नंतर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर ती जमिन खासगी असल्याचे सिद्ध झाले होते. शिवप्रेमींनी नंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान केला होता. सोमवारी सकाळी पुन्हा या ठिकाणी सुमारे दोनशे लोक जमले होते. मडगाव विभागाचे उपदंडाधिकारी सुयश खांडेपारकर हेही घटनास्थळी होते. त्यांनी जमावाला शांतता राखण्याचेही आवाहन केले.नंतर मंत्री सुभाष फळदेसाई हे पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले. अनावरण करुन परत जात असताना जमावाने त्यांना घेरले व त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यास सुरुवात केली. आमच्या गावात हा पुतळा नकोच अशी भाषाही जमावाने वापरली. मिरवणुक काढण्यासही देणार नाही असे सांगत रस्ता रोखून धरला. फळदेसाई यांनी त्यांना समजाविताना ही जागा खासगी असून, काही हरकत असल्यास उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊ असेही सांगितले. मात्र जमाव काहीच ऐकायला तयार नव्हता. त्याचवेळी पाठीमागून त्यांच्यावर दगडफेकले गेले, नंतर पोलिसांनी कडे करुन त्यांना सुखरुप बाहेर काढले.दरम्यान, फळदेसाई यांनी आपण या प्रकरणी पोलिसांत तक्रार केलेली नाही. आपल्याला हे प्रकरण चिघळविण्याचे नाही. सर्वांनी शांतता राखावी असे आवाहन केले. दगडफेकीनंतर त्यांनी आपल्या घरी जाऊन डॉक्टरकडून उपचार करुन घेतले.

टॅग्स :goaगोवा