शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पणजीतून काँग्रेसचा प्रबळ उमेदवार : लुईझिन

By admin | Updated: November 16, 2014 01:30 IST

पोटनिवडणूक : पारेख, फुर्तादो यांच्या नावाची चर्चा

पणजी : पणजी मतदारसंघात आता पोटनिवडणूक अटळ असल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसतर्फे प्रबळ उमेदवार रिंगणात उतरविला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी म्हटले आहे. पणजीचे आमदार असलेले माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर देशाचे संरक्षणमंत्री बनल्यामुळे तसेच ते लखनौहून राज्यसभेचे सदस्य बनल्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. लवकरच ते राजीनामा देण्याची शक्यताही आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रबळ उमेदवार उतरविण्यात येणार असल्याचे फालेरो यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उमेदवार कोण असेल ते योग्यवेळी जाहीर केले जाईल. पर्रीकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यावर उमेदवार निवडीची प्रक्रिया हाती घेतली जाईल. घटनात्मक प्रक्रिया पार पाडूनच उमेदवार निवडला जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेसतर्फे गेल्या विधानसभा निवडणुकीत पर्रीकर यांच्या विरोधात लढलेले माजी महापौर यतीन पारेख, सध्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनाही काँग्रेसचे सांभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. सलग ४ वेळा निवडून येणारे पर्रीकर हे पणजीतील आतापर्यंत सर्वात प्रबळ उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या नंतर पणजीचे प्रतिनिधित्व कोण करणार या बद्दल अद्याप भाजपमध्येच उमेदवारी ठरलेली नाही. पणजीचा उमेदवार ठरविण्याचे सर्व अधिकार पक्षाने पर्रीकर यांनाच दिले आहेत. लोकांत मिसळणाऱ्या माणसालाच उमेदवारी दिली जाईल, असे पर्रीकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)