शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याऐवजी तिजोरीच साफ केली; भाजपा सरकारवर काँग्रेसची तोफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:20 IST

भाजपा सरकार अपयशी ठरल्याचा दावा

पणजी : गोवा  सरकारच्या सुमार कामगिरीवर तोफ डागताना प्रदेश काँग्रेसने वेगवेगळ्या निकषांवर सरकार अपयशी ठरल्याबद्दल टीकेची झोड उठविली आहे. पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेसचे संवाद विभागप्रमुख ट्रोजन डिमेलो म्हणाले की, ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात दहा निकष लावून केलेल्या सर्वेक्षणात सरकारची कामगिरी अगदीच सुमार आढळून आलेली आहे. रोजगार संधी, कचरा विल्हेवाट, दर नियंत्रण या बाबतीत सरासरीपेक्षाही बरेच कमी गुण राज्य सरकारला मिळाले आहेत.’ स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत तिजोरी साफ केली. मात्र कचरा काही साफ झाला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचे सोडून आहेत त्याही गमावल्या. खाणी बंद झाल्याने लोकांचा रोजगार गेला. नोटाबंदीमुळे देशभरात नोकऱ्या गेल्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधांच्या बाबतीतही सरकार अपयशी ठरले. हा अहवाल नजरेसमोर ठेवून लोकसभेसाठी आगामी निवडणुकीत दोन्ही जागा तसेच विधानसभेच्या तीन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीत जनता भाजपला धुडकावून लावील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाचे प्रवक्ते अ‍ॅड. रोहित ब्रास डिसा म्हणाले की, ‘या अहवालाबाबत मुळीच प्रश्न उपस्थित करता येणार नाही. कारण शास्रोक्त पद्धतीने तो तयार करण्यात आला आहे. राज्यात भाजप आघाडी सरकार सुशिक्षितांना नोकऱ्या देऊ शकलेले नाही. कचरा विल्हेवाटीच्या प्रश्नावर न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले.’

मुख्यमंत्र्यांच्या विधानाला आक्षेप दरम्यान, कारवार येथे निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कन्नडिगांना गोव्यात नोकºया देण्याचे जे कथित विधान केले त्याला काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. डिमेलो यांनी या विधानाला हरकत घेताना ‘गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण’ याचा उद्घोष करणारे गप्प का असा सवाल केला आहे. पत्रकार परिषदेस अमरनाथ पणजीकर तसेच अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे सचिव शंकर गौडा पाटील हेही उपस्थित होते.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस