शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मडगावच्या जिल्हा इस्पितळ खासगीकरणास काँग्रेसचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 22:36 IST

मडगाव येथील नव्या जिल्हा इस्पितळाच्या खासगीकरणास प्रदेश काँग्रेसने जोरदार विरोध दर्शविला आहे.

पणजी : मडगाव येथील नव्या जिल्हा इस्पितळाच्या खासगीकरणास प्रदेश काँग्रेसने जोरदार विरोध दर्शविला आहे. लवकरच उद्घाटन होणार असलेले हे इस्पितळ सार्वजनिक-खासगी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यास देण्याचा हेतू शुद्ध नाही. यामागे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकारने आधी पीपीपी धोरण जाहीर करावे, अशी मागणी पक्षाने केली आहे. 

पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘ गोमेकॉसारख्या सरकारी इस्पितळामध्ये एवढ्या दर्जेदार सुविधा आहेत की शेजारी राज्यातील लोकही उपचारांसाठी येथे येतात. गोव्यात खासगी इस्पितळांमध्ये डायलिसीस तसेच हृदयरोगावरील उपचारासाठी कॅथलॅब सुरू करण्यात आल्या. परंतु खासगी व्यवस्थापनांना त्या बंद कराव्या लागल्या. गोमेकॉसारखे सरकारी इस्पितळ चांगली वैद्यकीय सेवा देऊ शकते तर हे जिल्हा इस्पितळ का नाही?, असा चोडणकर यांचा सवाल होता.

सरकारने गरीब जनतेला नजरेसमोर ठेवून प्रत्येक क्षेत्रात कल्याणकारी सेवा द्यायला हवी. खासगीकरणामुळे लोकांना पैसे बाहेर काढावे लागणार. सर्वच लोकांना हे परवडते असे नाही. चोडणकर म्हणाले की,‘ मडगाव येथे सुरू होणार असलेल्या जिल्हा इस्पितळासाठी २00 कोटी रुपयांहून अधिक सरकारने गुंतविले आहेत. २५ कोटींची जमीन, बांधकामासाठी १५0 कोटी, ३0 कोटींची वैद्यकीय उपकरणे, हा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून करण्यात आला आहे. पीपीपी तत्त्वावर हे इस्पितळ चालविण्यासाठी पुढे येणा-या कंपनीला आयतेच सर्व मिळणार आहे. कंपनीकडे ३३ वर्षांसाठी समझोता करार किंवा ९९ वर्षांकरिता लीज करार करण्याच्या हालचाली चालू आहेत.पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.’ चोडणकर म्हणाले की, विश्वजित यांचे पिता प्रतापसिंह राणे यांनी काँग्रेस सत्तेत असताना अनेक वर्षे मुख्यमंत्रीपद भोगले आहे. कदंब बससेवा असो की शिक्षण क्षेत्रात गरीबांना सवलती असोत त्यांनी नेहमीच कल्याणकारी निर्णय घेतले. विश्वजित मात्र नेमके उलट वागत आहेत. पत्रकार परिषदेस प्रदेश काँग्रेसच्या माध्यम विभागाचे संवाद प्रमुख ट्रोजन डिमेलो, काँग्रेसे सेवा दलाचे गोवा प्रमुख शंकर कीर्लपालकर, कुंभारजुवें गटाध्यक्ष विशाल वळवईकर आदी उपस्थित होते.