शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आमदारांचा भाजपाकडून छळ, हळर्णकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 13:44 IST

भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या आमदारांचा छळ करत आहे. यापूर्वी माजी मंत्री सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हे या छळापोटीच काँग्रेसला सोडून गेले, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी गुरुवारी केला.

ठळक मुद्देभारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या आमदारांचा छळ करत आहे. माजी मंत्री सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हे या छळापोटीच काँग्रेसला सोडून गेले, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी केला.काँग्रेसचे दहा आमदार भाजपामध्ये नुकतेच येऊ पाहत होते पण आम्ही त्यांना भाजपामध्ये घेतले नाही, अशी माहिती बुधवारीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली होती.

पणजी - भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या आमदारांचा छळ करत आहे. यापूर्वी माजी मंत्री सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हे या छळापोटीच काँग्रेसला सोडून गेले, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी गुरुवारी केला.

काँग्रेसचे दहा आमदार भाजपामध्ये नुकतेच येऊ पाहत होते पण आम्ही त्यांना भाजपामध्ये घेतले नाही, अशी माहिती बुधवारीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व हळर्णकर यांनी काँग्रेसची बाजू पत्रकार परिषदेत मांडली. हळर्णकर म्हणाले, की पूर्ण देश काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपाचे ध्येय आहे असे भाजपाचे राष्ट्रीय नेते सांगतात. मग जर काँग्रेसच्या एकूण पंधरापैकी दहा आमदार भाजपामध्ये येत होते ही गोष्ट खरी असेल तर तेंडुलकर यांनी ती संधी कशी सोडली असा प्रश्न निर्माण होतो. कारण दहा आमदार पक्षाला सोडून भाजपामध्ये गेले तर गोवा काँग्रेसमुक्त करण्याच्या दिशेने ते भाजपाचे मोठे पाऊल ठरले असते. भाजपाचे नेते खोटे बोलतात. 

हळर्णकर म्हणाले, की यापूर्वी शिरोडकर यांचा 70 कोटींच्या जमिनीच्या विषयावरून भाजपाने छळ केला व शिरोडकर कंटाळून भाजपामध्ये गेले. सोपटेंच्या मतदारसंघातही भाजपाने विकास कामे रोखली होती व त्यामुळे सोपटेंनी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या आमदारांचा अशा प्रकारे छळ करणे हे भाजपाचे तंत्र आहे. आपण तर भाजपामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. कारण माझा जन्मच सॅक्युलर पक्षासाठी झाला आहे.

चोडणकर म्हणाले, की भाजपाचे नेते साठ कोटी रुपयांचे पॅकेज घेऊन फिरत होते. काँग्रेसच्या आमदारांनी ते पॅकेज नाकारले. आम्ही भाजपाची पॅकेज पद्धत उघडी पाडली व त्यानंतर स्वत:ची लाज राखण्यासाठी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे दहा आमदार फुटण्यासाठी प्रस्ताव घेऊन आले होते, अशी खोटी कथा तयार केली. भाजपाच्या नेत्यांनी कधी तरी खरे बोलावे. भाजपावाले कॅसिनो जुगारप्रश्नी सध्या जे काही बोलतात ते ऐकून लोक त्यांना हसतात.

 

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवाcongressकाँग्रेस