काँग्रेसचे आमदार हादरले

By Admin | Updated: May 18, 2014 00:36 IST2014-05-18T00:36:13+5:302014-05-18T00:36:34+5:30

काँग्रेसचे आमदार हादरले

Congress MLA Hatharlee | काँग्रेसचे आमदार हादरले

काँग्रेसचे आमदार हादरले

पणजी : लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या ताब्यातील नऊपैकी आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने आघाडी प्राप्त केली. भाजपला राज्यभर मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि काँग्रेसच्या मतदारसंघांतही भाजपने मारलेली बाजी, यामुळे काँग्रेस विधिमंडळ पक्ष हादरल्यासारखी सध्या स्थिती अनुभवास येत आहे. काँग्रेसचे काही आमदार तर निवडणूक निकालाने हादरलेच आहेत, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कुंभारजुवे मतदारसंघात काँग्रेसला एक हजार मतांची आघाडी मिळेल, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाने गृहीत धरले होते. केपेतही काँग्रेसचे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आपल्यालाच आघाडी मिळेल, असे गृहीत धरले होते. कुंभारजुवेत रवी नाईक व पांडुरंग मडकईकर या दोघांनीही प्रचार काम केले होते; पण तिथे भाजपला आघाडी मिळाली. केपेतही बाबू कवळेकर व आलेक्स रेजिनाल्ड यांनी काम करूनदेखील भाजपची लाट रोखणे त्यांना शक्य झाले नाही. (पान २ वर)

Web Title: Congress MLA Hatharlee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.