शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात गोवा विलीन करू पाहणार्‍यांसोबत कॉंग्रेसची युती दुर्दैवी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 17:42 IST

चर्चिल आलेमाव यांची टीका: अशा पक्षाशी राष्ट्रवादी संबंध ठेवणार नाही 

मडगाव: जिल्हा पंचायत निवडणुकीत गोव्यात कॉंग्रेस पक्षाने मगो पक्षाबरोबर युती करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी टीका करताना , ज्या पक्षाने गोव्याचे विलींनीकरण महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न केला त्याच मगोशी कॉंग्रेस युती करते ही दुर्दैवाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी गोव्यात अशा कॉंग्रेसशी युती करू पाहत नाही असे ते म्हणाले.

यावर प्रतिवार करताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सध्या चर्चिलची युती नेमकी कुणा बरोबर आहे आणि भाजपा मुख्यमंत्र्याबरोबर असलेले साठेलोटे बाणावालीकरांनाच नव्हे तर सगळ्या गोवेकरांना माहीत आहेत असे म्हटले. चोडण कर म्हणाले, आम्ही कुठल्याही पक्षाकडे युती केलेली नाही. पण भाजपला रोखण्यासाठी ज्या ठिकाणी आमच्याकडे बलवान उमेदवार नाहीत तिथे आम्ही दुसर्‍या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचे ठरविले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे बुधवारी कोलवा, बाणावली व कुड्तरी या तीन जिल्हा पंचायत मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरले . यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुजे फिलिप डिसोझा हेही उपस्थित होते. बाणावलीतून मिनिन फेर्नादिस ,कोलव्यातून वानिया बाप्तिस्ता व कुडतरीतून सरिता फेर्नादिस या तिघांनी अर्ज भरले.यावेळी बोलताना जुजे फिलिप डिसोझा यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादी किमान दहा उमेदवार उतरविणार असे सांगितले. उत्तर गोव्यातही आमचे उमेदवार असतील असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस