दहाही बंडखोर आमदारांविरुद्ध काँग्रेस सभापतींकडे, हायकोर्टात अपात्रता याचिका सादर करणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 18:16 IST2019-07-11T18:15:10+5:302019-07-11T18:16:13+5:30

दहाही बंडखोर आमदारांविरुद्ध काँग्रेस सभापतींकडे तसेच हायकोर्टात अपात्रता याचिका सादर करणार असल्याचे पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी सांगितले.

Congress against 10 rebel MLAs | दहाही बंडखोर आमदारांविरुद्ध काँग्रेस सभापतींकडे, हायकोर्टात अपात्रता याचिका सादर करणार  

दहाही बंडखोर आमदारांविरुद्ध काँग्रेस सभापतींकडे, हायकोर्टात अपात्रता याचिका सादर करणार  

पणजी : दहाही बंडखोर आमदारांविरुद्ध काँग्रेस सभापतींकडे तसेच हायकोर्टात अपात्रता याचिका सादर करणार असल्याचे पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी सांगितले. पक्षाच्या दहा आमदारांनी राजीनामे देऊन विधिमंडळ पक्षच भाजपात विलीन केल्याच्या पार्श्वभूमीवर चेल्लाकुमार तातडीने गोव्यात दाखल झाले. पक्षाचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांच्याशी चर्चा करून त्यांनी राजकीय स्थितीचा आढावा घेतला.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चेल्लाकुमार म्हणाले की, दहाही बंडखोर लवकरच अपात्रता याचिका सादर करणार आहोत. ‘बाबुशना तिकीट दिली ही चूकच’ दरम्यान, या फोडाफोडीचे सूत्रधार आमदार बाबुश मोन्सेरात हेच असल्याचा आरोप करून चेल्लाकुमार म्हणाले की, ‘अलीकडेच झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बाबुश यांना तिकीट देऊन फार मोठी चूक केली. बाबुशना उमेदवारी देण्यास त्यावेळी मी विरोध केला होता.’

Web Title: Congress against 10 rebel MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा