‘ब्राझिल’चा खर्च जमा करा!

By Admin | Updated: July 3, 2014 01:18 IST2014-07-03T01:16:07+5:302014-07-03T01:18:17+5:30

पणजी : ब्राझिल दौऱ्यावर गेलेले मजूरमंत्री आवेर्तीन फुर्तादो, वेळ्ळीचे आमदार बेंजामिन सिल्वा, हळदोणेचे भाजप आमदार ग्लेन टिकलो व वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा

Collect Brazilian Expenses! | ‘ब्राझिल’चा खर्च जमा करा!

‘ब्राझिल’चा खर्च जमा करा!

पणजी : ब्राझिल दौऱ्यावर गेलेले मजूरमंत्री आवेर्तीन फुर्तादो, वेळ्ळीचे आमदार बेंजामिन सिल्वा, हळदोणेचे भाजप आमदार ग्लेन टिकलो व वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा या चौघांनाही खर्चाचे पैसे ३१ जुलैपर्यंत शासकीय तिजोरीत जमा करण्यास सरकारने बजावले आहे.
चौघा जणांचा ताफा दहा दिवसांच्या ब्राझिल दौऱ्यावर गेला आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी ते गेले असून त्यांना गोवा सरकारच्या क्रीडा प्राधिकरणाने विमानांची तिकिटे दिली आहेत. सरकारने शासकीय खर्चाने होऊ घातलेला ब्राझिल दौरा रद्द करण्यापूर्वीच क्रीडा प्राधिकरणाने (सॅग) सहा मंत्री-आमदारांची तिकिटे मुंबईतील टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे आरक्षित केली होती.
सरकारने शासकीय खर्चाने ब्राझिलला जाऊ नका, अशी सूचना मंत्री-आमदारांना करण्यापूर्वीच कंपनीला सरकारकडून पैसे पोहोचले होते. त्यामुळे तिकिटे रद्द केली गेली नाहीत. फक्त क्रीडामंत्री रमेश तवडकर व वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी ब्राझिल दौऱ्यातून माघार घेतल्याने त्यांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. शासकीय खर्चाने विदेशात जाण्याच्या पूर्वीच्या योजनेवर यापूर्वी देशभरातून टीका झाली. (खास प्रतिनिधी)

Web Title: Collect Brazilian Expenses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.