शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दारूच्या नशेत किरकोळ वादानंतर एका सहकाऱ्याने केला दुसऱ्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 20:09 IST

किरकोळ विषयावरून मारामारी झाल्यानंतर ५३ वर्षीय स्वामीनाथन मणी यांने विश्वामित्र सिंग (वय ५१) याच्या डोक्यावर, पोटावर तसेच अन्य ठिकाणी धारदार वस्तूने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला.

वास्को: चिखली, वास्को येथे असलेल्या नौदलाच्या ‘नेवल आरमामेंन्ट डेपो’ मध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणा-या दोघात किरकोळ विषयावरून मारामारी झाल्यानंतर ५३ वर्षीय स्वामीनाथन मणी यांने विश्वामित्र सिंग (वय ५१) याच्या डोक्यावर, पोटावर तसेच अन्य ठिकाणी धारदार वस्तूने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. चिखली येथे नौदलाची शस्त्रे, हत्यारे व इतर सामग्री ठेवण्यात येणा-या ह्या ठिकाणी स्वामिनाथन व विश्वामित्र सुरक्षारक्षक म्हणून कामाला असून दोघेही जण बुधवारी (दि.११) रात्री एकत्र बसून जेवण तसेच मद्यपान करत असताना त्यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर स्वामिनाथन याने विश्वामित्र याच्यावर धारदार वस्तूने हल्ला करून खून केल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली.वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना बुधवारी रात्री ९.३० ते ११.५० च्या दरम्यान घडली. चिखली येथे असलेल्या नौदलाच्या ‘नेवल आरमामेंन्ट डेपो’ मध्ये स्वामिनाथन व विश्वामित्र सुरक्षारक्षक (डिफेंन्स सिक्युरिटी क्रोप्स) म्हणून कामाला आहेत. बुधवारी रात्री दोघेही जण एकत्र मद्यपान तसेच जेवण करण्याकरिता बसले होते. यावेळी दोघांमध्ये किरकोळ विषयावरून वाद निर्माण झाल्याची माहिती पोलिसांना चौकशीच्या वेळी मिळाली असून हा वाद नंतर मारामारीवर जाऊन पोहोचला.सदर मारामारीचा प्रकार घडल्यानंतर स्वामीनाथन त्यांना तेथे राहण्यासाठी असलेल्या इमारतीत (बेरेक मध्ये) निघून गेला, मात्र विश्वामित्र पुन्हा इमारतीच्या खाली येऊन त्यांने स्वामीनाथन यास खाली बोलवण्यास सुरवात केली. स्वामीनाथन खाली येत नसल्याने विश्वामित्र बेरेक इमारतीत जाऊन तो स्वामीनाथन यास जबरदस्तीने इमारतीच्या खाली घेऊन आल्यानंतर पुन्हा दोघात मारामारी होण्यास सुरवात झाली. यावेळी स्वामीनाथन यांने विश्वामित्रच्या डोक्यावर, पोटावर, हातावर धारधार वस्तूने हल्ला केल्याने विश्वामित्र खाली जमिनीवर कोसळला. तो खाली कोसळल्याचे पाहील्यानंतर स्वामीनाथन पुन्हा आपल्या बेरेक मध्ये जाऊन झोपल्याची माहीती पोलीसांना प्रथम तपासणीच्या वेळी मिळाली आहे. मध्यरात्री १२ वाजल्यानंतर सदर बेरेक इमारतीत असलेल्या अन्य सुरक्षा रक्षकाबरोबरच स्वामीनाथन व विश्वामित्र यांची ड्युटी सुरू होणार होती. त्यांना तसेच अन्य सुरक्षा रक्षकांना ड्युटीवर बोलवण्यासाठी त्यांचा अन्य एक सहकारी ह्या बेरक इमारतीत येण्यासाठी येत असताना त्यांने विश्वामित्र सिंग याला रक्ताच्या थारोळ््यात जमनिवर पडल्याचे पाहील्यानंतर त्यांने त्वरित आवाज करून नंतर त्याला उपचारासाठी चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेले.विश्वामित्र याला इस्पितळात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी येथे घोषित केल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली. विश्वामित्र याचा खून झाल्याचे नौदल पोलीसांना तसेच अन्य अधिकाऱ्यांना कळताच नंतर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी वास्को पोलीसांना सदर घटनेबाबत माहीती दिली. तसेच विश्वामित्र याचा खून कोणी केला याची चौकशी नौदलातील अधिकाºयांनी करण्यास सुरुवात केली असता त्यांना स्वामीनाथन व विश्वामित्र यांच्यात झालेल्या भांडणाची माहीती मिळताच त्यांनी स्वामीनाथन याला येथे ठेवून पोलीसांच्या ताब्यात दिला. खून केल्यानंतर स्वामीनाथन बेरेकमध्ये जाऊन झोपल्यानंतर तो ड्युटी करण्यासाठी उठला तेव्हा त्याने आपण काय केले आहे याची जाणीव न करून देण्याचे अनेक प्रयत्न केले.स्वामीनाथन व विश्वामित्र यांच्यात किरकोळ विषयावरून वाद झाल्याची माहीती काही जणांना असल्याने त्याला येथे पकडून ठेवल्यानंतर वास्को पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला. वास्को पोलीसांना सदर खूनाची माहीती मिळताच गुरूवारी (दि. १२) सकाळी पोलीस निरीक्षक निलेश राणे तसेच इतर पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. तसेच गुरूवारी दुपारी स्वामीनाथन याला सदर खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. स्वामीनाथन यांने आपण खून केला असल्याची कबूली दिलेली असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. सदर खून प्रकरणातील संशयित स्वामीनाथन मणी हा मूळ वेल्लूर, तमीळनाडू येथील रहीवाशी असून मरण पोचलेला विश्वामित्र उत्तरप्रदेश येथील रहीवाशी असल्याची माहीती पोलीसांनी दिली. धारधार वस्तूने हल्ला केल्यानंतर स्वामीनाथन तेथून निघून गेल्यानंतर विश्वामित्र सुमारे दोन तास इमारतीच्या बाहेर असलेल्या जागेत पडूनच राहील्याने रक्तस्त्राव होऊन तो मरण पोचल्याची माहीती पोलीसांनी दिली.विश्वामित्र याच्यावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली ती धारदार वस्तू पोलीसांना अजून सापडलेली नसून तीचा शोध चाली आहे. मयत विश्वामित्र याचा मृतदेह शवगृहात पाठवण्यात आलेला असून उद्या त्याच्यावर शवचिकित्सा करण्यात येणार असल्याची माहीती वास्को पोलीसांनी दिली. स्वामीनाथन यांने विश्वामित्र याचा खून करण्यामागे फक्त किरकोळ वादच आहे काय की ह्या हत्यामागे अन्य काही कारण आहे याचासुद्धा पोलीस सध्या तपास करीत आहेत. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.