शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

गोव्यात माडाला राज्य वृक्षाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 9:13 PM

मंत्रिमंडळाचा निर्णय : विधेयक येणार

ऑनलाईन लोकमतपणजी, दि. २ : १९८४ सालच्या गोवा, दमण आणि दिव वृक्ष संवर्धन कायद्यात दुरुस्ती करून माडाला राज्य वृक्ष म्हणून मान्यता द्यावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने बुधवारी मंजूर केला. दुरुस्ती विधेयक यापुढे विधानसभेत सादर केले जाणार आहे. यामुळे ‘माडत’ हा वृक्ष यापुढे राज्य वृक्ष राहणार नाही.मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. माडाला अगोदर झाडाचा दर्जा नव्हता. त्यास झाडाचा दर्जा द्यावा व तेच झाड राज्य वृक्ष म्हणून मान्य करावे, अशा प्रकारची दुरुस्ती आणली जाईल. मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेतला आहे. २०१६ साली कायदा दुरुस्ती करून माडाचा झाड हा दर्जा काढून टाकला गेला होता. आता चाप्टर वनमध्ये २(आय) कलमानुसार माड हे झाड बनले आहे. माडाला राज्य वृक्ष म्हणून जाहीर करण्यासाठी १९८४ सालच्या गोवा, दमण आणि दिव वृक्ष संवर्धन कायद्यात कलम ७ अ समाविष्ट केले जाणार आहे. ज्या शेतक-यांना किंवा बागायतदारांना एखादा माड निरुपयोगी वाटला किंवा तो कापावा असे वाटले व त्याजागी दुसरे झाड लावावे असे वाटले, तर तशी व्यवस्था करता यावी म्हणून कायद्यातील कलम दोननंतर कलम ८ अ हे नवे कलम समाविष्ट केले जाणार आहेत. या कलमानुसार कृषी अधिकारी नेमून माडाच्या बागायतीच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत, असे मंत्रिमंडळाने संमत केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. वृक्ष संवर्धन कायद्यात ३२ अ हे नवे कलमही समाविष्ट केले जाणार आहे. व्यवसायिक कारणास्तव लागवड करण्याचा विषय या कलमानुसार हाताळला जाणार आहे.

माडाला पुन्हा कायद्यानुसार झाड बनविले जाईल व माडाला राज्य वृक्षाचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. आम्ही ते आश्वासन पाळले आहे. माडासाठी वृक्ष संवर्धन कायद्यात दुरुस्ती केली जाईल.- मंत्री विजय सरदेसाई