कळंगुट येथे ६ ग्रॅम वजनाचा अन् ६० हजार रुपये किमतीचा कोकेन जप्त

By काशिराम म्हांबरे | Updated: March 20, 2024 20:06 IST2024-03-20T20:06:04+5:302024-03-20T20:06:25+5:30

म्हापसा/ काशिराम म्हाबरे- कळंगुट पोलिसांनी खोब्रावाडा कळंगुट येथील एका मंदिरा नजीक छापा मारून रोशन कुमार (वय 30, मूळ झारखंड) या संशयिताकडून ...

Cocaine weighing 6 grams and worth Rs 60,000 seized in Calangute | कळंगुट येथे ६ ग्रॅम वजनाचा अन् ६० हजार रुपये किमतीचा कोकेन जप्त

कळंगुट येथे ६ ग्रॅम वजनाचा अन् ६० हजार रुपये किमतीचा कोकेन जप्त

म्हापसा/ काशिराम म्हाबरे- कळंगुट पोलिसांनी खोब्रावाडा कळंगुट येथील एका मंदिरा नजीक छापा मारून रोशन कुमार (वय 30, मूळ झारखंड) या संशयिताकडून ६ ग्रॅम वजनाचा तसेच ६० हजार रुपये किमतीचा कोकेन हा अमली पदार्थ जप्त केला आहे.

संशयित संबंधित परिसरात अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती . त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आलेला. ग्राहकाच्या प्रतीक्षेत असताना रचलेल्या सापळ्यातून त्याला रंगेहात पकडण्यात आले. आज बुधवार २० मार्च रोजी निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. संशयिता विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.  उपनिरीक्षक पराग पारेख पुढील तपास करीत आहे.

Web Title: Cocaine weighing 6 grams and worth Rs 60,000 seized in Calangute