चेन्नईत राष्ट्रीय परिषदेच्या समारोपावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:47 IST2025-07-28T13:46:37+5:302025-07-28T13:47:23+5:30
व्हीआयटी चेन्नई कॅम्पसमध्ये या राष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला.

चेन्नईत राष्ट्रीय परिषदेच्या समारोपावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : तामिळनाडू उच्च शिक्षण शिक्षक संघटना, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ व व्हीआयटीच्या विकसित भारत २०४७च्या रोडमॅपवरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थिती लावली.
व्हीआयटी चेन्नई कॅम्पसमध्ये या राष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला. ज्ञान, मूल्ये आणि नवोपक्रमाद्वारे भारताचे आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधणे भविष्य घडवणाऱ्या समर्पित शिक्षक प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
शिक्षक हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत २०४७ मध्ये विकसित करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्या दिशेने देशाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रवास सुरू आहे. विकसित भारत हे ध्येय पूर्ण करण्याच्या मोहिमेत शिक्षक
केंद्रस्थानी आहेत. शिक्षक हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते आणि बदलाचे उत्प्रेरक म्हणून पुढे येत आहेत. आपण स्वावलंबी भारतासाठी प्रयत्न करीत असताना, भावी पिढ्यांना सक्षम बनवण्यात शिक्षण क्षेत्र तसेच त्यातील घटकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.